भुईमूग शेंगा फोडणी यंत्र

ताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात. शेंगांच्या आकारमानाप्रमाणे जाळी बदलता येते, शिवाय जाळी व ब्रश यातील अंतर कमी-जास्त करता येते.

यंत्राची वैशिष्ट्ये -

    एका तासात एक मजूर सरासरी 60 ते 70 किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
    शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम व पैसा वाचतो.
    यंत्राने शेंगा फोडल्यास सहा ते आठ टक्के फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
    यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.



संपर्क:

फोन नंबर - 02426 - 243219.

कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प,

डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment