मधमाशी ग्रीक बास्केट पोळे

पारंपरिक तंत्रज्ञान

ग्रीक बास्केट पोळे हे एक पारंपरिक तंत्रज्ञान आहे. ते आजही वापरण्यायोग्य आहे, कारण त्यात स्थानिक साहित्य वापरले जाते आणि त्याच्या निर्मितीसाठी स्थानिक कुशलता पुरते.

बांधणी

  • या बास्केटचा वरचा भाग रुंद असतो व अरुंद तळ असतो.
  • वरचा भाग १.२५ इंच रुंदीच्या समांतर लाकडी पट्ट्यांनी झाकलेला असतो, त्या अशाप्रकारे बसवलेल्या असतात की मधमाशीपासून सुरक्षित आवरण मिळेल. प्रत्येक पट्टी लांबीला बहिर्गोल (खालच्या बाजूने) असते, आणि मधली मोकळी जागा (क्लिअरंस) अंदाजे १ इंच असते. बहिर्गोल आकार पट्टीच्या मधोमध येणे आवश्यक आहे. दोन्ही टोकं अंदाजे २-३ इंच सपाट असावीत जेणेकरुन या पट्ट्या ज्याठिकाणी बास्केटच्या कडेवर बसतात तिथून मधमाशा जाऊ शकणार नाहीत. या पट्ट्या बास्केटच्या परिघापेक्षा मोठ्या असतात. (आकृती १ पाहा).
  • लांबीच्या अंगाने, प्रत्येक पट्टीच्या मध्यात, पोळ्याचा एक चांगला तुकडा खालून बसवला जातो, त्यात मधमाश्यांचं वितळलेलं मेण असतं जेणेकरुन माश्यांना सरळ पोळी बांधण्यास दिशा दाखवली जाईल.
  • या बास्केटला आतून आणि बाहेरच्या बाजूने दोन भाग गायीचे ताजे शेण आणि एक भाग माती मिसळून लिंपले जाते. (आकृती २). हा लेप कोरडा झाल्यानंतर, पट्ट्या बास्केटच्या वरती ठेवल्या जातात आणि तिच्यावर गवतापासून बनवलेल्या तिकोणी टोपीने ती झाकली जाते म्हणजे सूर्यप्रकाश आणि पावसापासून तिचं रक्षण होईल (आकृती ३ पाहा).
Bee 1.jpg
  • पोळ्याचं प्रवेशद्वार तळापासून किमान ३ इंचावर असावं म्हणजे एखादं पोळं जरी पडलं तरी, प्रवेशद्वार अडणार नाही. (आकृती ४ पाहा).
  • मध तयार झाल्यावर आणि मधाचा प्रवाह थांबल्यानंतर, पोळी पट्ट्यांपासून कापली जातात. पण, प्रत्येक पट्टीवर पाव इंचाची पोळ्याची एक पातळ पट्टी तशीच ठेवली जाते म्हणजे मधमाशा पुन्हा त्यावर सरळ, नवीन पोळी बांधू शकतील.


स्रोत: ग्राम विज्ञान केंद्र, मगन संग्रहालय, वर्धा – ४४२ ००१, महाराष्ट्र
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment