बोरांपासून गोड गोळ्या उर्फ कँडी बनवणे
बोर (झिझिफस मॉरिटानिया एल) हे आपल्या
देशाच्या कोरड्या तसेच अर्ध-कोरड्या भागात मुबलकपणे मिळणारे महत्त्वाचे फळ
असले तरी आजपर्यंत त्याचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करण्याचे कोणाच्या
फारसे ध्यानात आलेले नाही. बोरामध्ये पोषणमूल्ये चांगल्या प्रमाणात असतात.
थायमिन, रायबोफ्लाविन आणि नियासिन ही ब वर्गातील जीवनसत्वे त्यात भरपूर
सापडतात. शिवाय बोरात क जीवनसत्व आणि बीटा-कॅरोटिन या अ जीवनसत्वाचादेखिल
अंश सापडतो. बोरामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम व लोहासारखी खनिजे असतात.
बोरापासून प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स)
बनवल्यास ते बराच काळ टिकतील आणि त्यांना उत्तम बाजारपेठही मिळेल. सायफेट
(CIPHET) ने, ऑस्मो-एअर ड्राइंग तंत्रज्ञानाचा वापर करून,बोराच्या गोड
गोळ्या म्हणजेच कँडी बनवली आहे.
बोराची कँडी
चांगली फळे नळाच्या पाण्याने धुवून
त्यांवरची माती, कचरा इ. काढले जातात. प्रत्येक बोराचे देठ हाताने काढले
जाते. स्टेनलेस स्टीलच्या अत्यंत धारदार सुरीने बोराची साल काढतात. ह्या
सर्व प्रक्रियेदरम्यान, खराबी किंवा संसर्ग टाळण्यासाठी, कमालीची स्वच्छता
राखली जाते. ह्यानंतर फळाच्या गराच्या फोडी केल्या जातात व बिया काढून
टाकतात. कँडीला फिका व एकसारखा रंग येण्यासाठी ह्या फोडींवर 0.2 % केएमएसने
ब्लांचिंगची प्रक्रिया करतात. ऑस्मॉटिक एजंट (कारक) म्हणून साखरपाणी (30,
40, 50 and 60 °B) वापरतात. ह्याला 100 °C पर्यंत उकळवून व त्यात 0.2 %
सायट्रिक ऍसिड टाकून साखरेचा पाक करतात. हा पाक नंतर वस्त्रगाळ करून
वातावरणीय तापमानापर्यंत थंड करतात. प्रत्यक्ष बोराची कँडी बनवण्यासाठी एका
भांड्यात बोरांच्या फोडी व साखरेचा पाक 1:2 (फोडीःपाक) ह्या प्रमाणात घेऊन
48 तासांपर्यंत मुरवतात. ह्यानंतर पाक काढून टाकतात व बोराच्या फोडी
ट्रेमध्ये नीट ठेवून, ट्रे ड्रायरच्या सहाय्याने, 60 °C तापमानावर 5-6 तास
सुकवल्या जातात. थंड झाल्यानंतर हे तुकडे पॅक करतात.
बोराच्या कँडीचे पोषणात्मक प्रमाण –
आर्द्रता, TSS, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आम्लता (ऍसिडिटी), एकूण साखर व रिड्यूसिंग
साखर ह्या घटकांच्या संदर्भात - अनुक्रमे असे आहे - 10.08 %, 48 °B, 95.97
मिग्रॅ/100ग्रॅम, 0.225 %, 21.65 % व 9.67 %.
बोराच्या ह्या गोळ्यांचे पोषणात्मक मूल्य
चांगले असते आणि मुलांनी (मोठ्यांनीसुद्धा) कृत्रिम रंग व चवी घालून
बनवलेल्या इतर गोळ्यांपेक्षा बोराची कँडी खाणे नक्कीच हिताचे आहे.
अधिक माहिती येथे मिळेल
सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट-हार्वेस्ट इंजिनियरिंग ऍँड टेक्नॉलॉजी ,
लुधियाणा, 141004, पंजाब
दूरभाष: 91-161-2308669
इमेल: ciphet@sify.com
स्रोत: लुधियाणा येथील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट-हार्वेस्ट इंजिनियरिंग ऍँड टेक्नॉलॉजीचे इ-वार्तापत्र
0 comments:
Post a Comment