रेशीम कीटक पालन : जोपासना

चौकीची जोपासना म्हणजे काय?

रेशीम किड्यांच्या संगोपनाच्या पहिल्या दोन चरणांना चौकी म्हणतात. जर चौकी किड्यांचे संगोपन नीट झाले नाही, तर नंतरच्या चरणांत पैदास नासायची शक्यता असते. म्हणून, चौकी हा रेशमाच्या किड्यांचा निर्णायक म्हणजेच अत्यंत महत्वाचा काळ असतो ज्यामध्ये तापमान आणि आर्द्रता, आरोग्यमय वातावरण, गुणवत्तायुक्त पाने, उत्तम संगोपन सोयी आणि सर्वोपरि तांत्रिकी कौशल्य यांची फार गरज असते.

व्यावसायिक चौकी

संगोपन केंद्रे


म्हैसूरच्या CSRTI, मध्ये व्यावसायिक चौकी संगोपन प्रारूपाची स्थापना करण्यात आली होती ज्यामध्ये 1,60,000 डीएफएल (डिसीज् फ्री लेइंगस्) दर वर्षी 5000 डीएफएल दर बॅच प्रमाणे 32 बॅचेस् एका वर्षांत ब्रश करण्याची क्षमता होती. 2 वर्षांपर्यंत या प्रारूपाची यशस्वी चाचणी केल्यानंतर देशातील मुख्य रेशीम उत्पादन करणारया क्षेत्रांमध्ये हेच लोकप्रिय ठरले.

व्यावसायिक चौकी संगोपन केंद्रांच्या गरजा

  • व्यावसायिक चौकी संगोपन केंद्राला चौकी सिंचित तुतीची बाग, सर्व आवश्यक उपकरणांसह चौकी संगोपन गृह आणि सर्वोपरि प्रशिक्षित/कुशल तसेच शास्त्रीय चौकी संगोपनाचा अनुभव असलेल्या मनुष्यबळाची गरज असते.
  • रेशीम किड्यांची अंडी धान्यकणांपासून आणि 80 ते 100 जोपासकांच्या मालकीच्या सुमारे 120 ते 150 एकर तुतीच्या बागांमधून आणणे आवश्यक असते ज्या चौकी संगोपन केंद्राच्या जवळपास असतात.
  • व्यावसायिक चौकी संगोपन केंद्राचे फायदे

  • निरोगी आणि धष्टपुष्ट तरूण रेशीम किड्यांना वाढविणे, ज्यायोगे कोशाची उपज स्थिर होईल आणि त्याच्या पैदाशीत वाढ होईल.
  • एकसारखे व निरोगी लार्व्हा आणि रेशीम किड्यांचे उत्पादन.
  • रोग व घाण यांच्या शक्यता कमी करणे.
  • संगोपनाच्या दरम्यान, लार्व्हा नष्ट होण्याची टक्केवारी कमी होणे म्हणजेच पैदाशीमध्ये वाढ होणे.
  • योग्य उष्णता दिल्याने अंडी चांगल्या प्रकारे उबविली जातात.

  • चौकीचे व्यवसायिक संगोपन CRC, समाविष्ट पध्दती, नोंदणी
    इत्यादींसाठी: सेंट्रल सेरिकल्चर रीसर्चएण्ड ट्रेनिंग इंस्टिटयूट, म्हैसूर येथे संपर्क करा.
    SHARE
      Blogger Comment
      Facebook Comment

    0 comments:

    Post a Comment