तुती बेणे तयार करणे:
तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.
तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया:
तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी.
1) थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत.
2) बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात.
3) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.
तुतीचे लागवड अंतर:
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेतकरी तुतीची लागवड करतांना 3 द 3 अंतरावर लागवड करीत होते. परंतू आता सन 98 - 99 पासून नविन सुधारीत पध्दतीनुसार फांदी पध्दत किटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पध्दतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालया मार्फत तुती लागवडीसाठी 5 द 2 द 1 फुट अंतर मध्यम जमिनीसाठी व 6 द 2 द 1 भारी जमिनीसाठी तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये तुती झाडाची सं'या एकरी 10890 इतकी बसते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात 3द3 फुट लागवड पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते.
पट्टा पध्दतीच्या तुती लागवडीपासून फायदे:
1) या पध्दतीमुळे झाडाची सं'या मोठया प्रमाणात वाढते.
2) तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते.
3) आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते.
4) कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो.
5) बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो.
6) शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते.
7) मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते.
तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी:
1) लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर
2) तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
3) तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये.
4) तुतीची लागवड 5 द 3 द2 किंवा 6 द 2 द 1 अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी.
5) तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये.
6) जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.
7) लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.
8) तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी.
तुती बागेची आंतर मशागत:
तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होवून तुती कलमाची पाने पिवळी पडतात तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात.त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. तदनंतर प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी.
तुती झाडांची छाटणी:
तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटनी करण्या फार महत्व आहे. सर्व साधारणपणे शेतकरी फांदी किटक संगोपन पध्दतीचा वापर करत असतांना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळयाने फांद्या खेचुन करतो. यामध्ये झाडांचा डींक बाहेर निघून वाया जातो. व मोठया प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळया झाड सुकून जाऊन गॅप पडतात या करिता शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमु'याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी. आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात. तदनंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व तदनंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी.
तुतीबागेस सिंचन:
माहे जुलै ते नोव्हेंबर - महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने कलमें जगेपर्यंत पाणी द्यावे नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जमिनीची प्रत पाहुन साधारणत: 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात एक वेळातुती लागवडीला 1 ते 1.5 एकर इंच पाण्याची आवश्यकता असते.
तुती लागवडीसाठी गांडुळ व इतर खताचा उपयोग:
तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशिर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यासाी पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतुचे कार्यप्रणाली वाढवितात त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होवून तुती पानामध्ये कार्बोहायड्ेट व प्रथीनांचे प्रमाण देखील वाढते,
गांडुळ खत वापरतांना घ्यावयाची काळजी:
1. गांडूळ खत रासायनिक खतामध्ये मिश्रण करुन टाकु नये.
2. रासायनिक खत वापरण्याआधी 1 महिन्या अगोदर गांडुळ खत तुती झाडांना द्यावे.
3. गांडुळ खतामध्ये शेणखत, कम्पोस्ट खत मिसळून टाकल्यास त्यांचा चांगला फायदा होतो.
4. गांडुळखत वापरल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल.
5. पहिल्या वर्षी नविन तुती लागवडीङ्ढकरीता डिसेंबर महिण्यात गांडुळ खत वापरावे.
ऍझोटोबॅक्टर:
ऍझोटोबॅक्टर या जीवाणूचा प्रती एकर प्रती वर्ष 8 किलो या प्रमाणात वापर केल्यास नत्राची मात्रा 50 टक्के ने कमी करता येते. ऍझोटोबॅक्टर, रासायनिक खताचे 10 ते 15 दिवस आधी किंवा नंतर शेणखतामध्ये मिसळून (1.6 किंलो ऍझोटोबॅक्टर + 80 किलो शेणखत या प्रमाणात) आंतरमशगतीच्या वेळेत टाकावे व तदनंतर लगेचच बागेस पाणी द्यावे.
तुतीबागेत रासायनिक खते:
तुतीची वाढ योग्य होणेसाठी रासायनिक खताची मात्रा देणे महत्त्वाचे आहे. तुती लागवड केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात कलामांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी 24 किलो नत्र, स्पुरद, पालाश रिंग पध्दतीने तुती झाडांचय बाजुला गोल खड्डे करुन द्यावे व खत दिल्यानंतर त्यावर मातीचा भर द्यावा. जेणेकरुन दिलेले खत वाया जाणार नाही. दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र रिंग पध्दतीने द्यावा अशी दोन वेळा रासायनिक खताची मात्रा पहिल्या वर्षी द्यावी. तुतीच्या बागेस माती परिक्षण करुनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेणखत व रासायनिक खते जमिनीत 8 ते 10 सेमी खोलवर टाकावीत. रासायनिक खतांचा वापर कराताना एकच मुलद्रव्यांची खते जसे नत्राकरिता अमोनियन सल्फेट, स्पुरादाकरिता सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशकरिता म्युरेट ऑफ पोटॅश यांचा प्राधान्याने वापर करावा.
रासायनिक खते:
नेहमीच प्रत्येक पिकाच्या छाटणीनंतर अंरमशागत झालेनंतर कोंब फुटतेवेळी 14 ते 21 व्या दिवशी देण्यात यावे.
तुतीच्या झाडांवरील रोग व नियंत्रण:
इतर झाडांप्रमाणेच तुतीच्या झाडांवर ही बरेच रोग आहेत. वेळेवर सर्व पाला वापरला गेल्यास मात्र या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून येत नाही. तसेच ठरावविक रोगांमुळे पुर्ण झाडाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पुर्ण पीक पाया गेले असे कधीही आढळून आलेले नाही. तरी देखील काही महत्वाच्या रोगांची व जे महाराष्ट्रात मु'यत्वे आढळून येतात अशा रोगांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
कलमावरील बुरशी:
तुतीच्या लागवडीच्या वेळेस कलमास शेतकरी, बुरशीनाशक द्रावणात बुडवत नाहीत. अतिपाण्यामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे सालीच्या आतील बाजूस काळी बुरशी येते, यामुळे झाडास फुटवा येत नाही किंवा आलेला फुटवा जळून जातो.
उपाय:
बुरशी नाशक द्रावणात तुती कलमे लावण्यापूर्वी 5-10 मिनिटे बुडवावीत व मग लागवडीस वापरावीत. प्रादर्भाव जास्त असेल तर फुटवा झालेवर देखील झाडांवर औषधे फवारावे.
वाळवी/उदई:
हलक्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव निश्तिच होतो. शेतकरी भारी जमीन सहसा तुती लागवडीसाठी वापरत नाहीत. त्यामुळे हलक्या जमिनीत लागवड केली की त्या जमिनीत मोठया प्रमाणात वाळवीचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेणखतातून जमिनीत उदई अथवा उदडीचा प्रादुर्भाव होतो. उदई कोवळी कांडी कुरतडून खातात व झाडांची मर वाढते. एकरी झाडांची सं'या कमी होते.
उपाय:
1. लागवड करतांना क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात, कांडया (कलमे) बुडवून लावावेत.
2. फुटवा झाल्यावर फयुरॉडॉन औषध मुळांजवळ दिल्यास वाळवी अथवा उदईचा त्रास होत नाही. किंवा कुठलेही वाळवी नाशक औषध वापरावे त्याचा परिणाम संपल्यानंतरच अळयांचे किटक संगोपन घ्यावे. झाडांची मुळे खोलवर गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर हा त्रास होत नाही.
पानांवरील बुरशी:
रोगाचे कारण फायलेक्टिनिया कोरिलीया, कालावधी पावसाळा व हिवाळा. तुती बागेतील पाने वेळेवर वापरली नाहीत व ज्या बागेत प्रकाश व्यवस्थित येत नाही. अशा बागेतील पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठ म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठी वेळेवर प्रमाणात अंडीपुंज घेऊन पाल्याचा वापर करावा.
उपाय:
वेळेत पाल्याचा वापर केल्यास रोग आढळत नाही, तथापी रोग मोठया प्रमाणात आढळयास पानांवर 0.2 टक्के बाविस्टीन अथवा 0.2 टक्के डायनोकॅप द्रावण फवारावे. फवारणीनंतर वीस दिवसांनी पाने वापरता येतात.
झाडांवर आढळून येणारी कीड:
टूक्रा (बोकडया):
लक्षणे:
1. शेंडयाच्या पानाचा आकार बदलतो.
2. पाने कोमजल्यासारखी दिसतात किंवा घडया पडून आकसतात.
3. ज्या फांदीवर टूक्रा आढळतो, तो भाग जाड किंवा चपटा बनतो.
4. पाने गडद हिरव्या रंगाची बनतात.
उपाय:
1. टूक्रा रोग असलेले झाडाचे शेंडे तोडून जाळून टाकावेत.
2. 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात (10 लिअर पाण्यात 50 ग्रॅम साबण टाकवा) 0.2 टक्के डी.डी.व्ही.पी. (न्युआन 2 मि.ली. 1 लिटर पाणी) चे द्रावण तयार करुन झाडांवर फवारावे.
3. क्रिप्सोलिनस मौंटेजरीचे 100 प्रौढ किटक 10 ते 12 हजार तुतीच्या झाडामध्ये सोडावेत
रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन
0 comments:
Post a Comment