रेशीम उद्योग-कापड निर्मिती

रेशीम कापड निर्मिती

एक विणकर एका हातमागावर 3-4 मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम कापडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो.

यंत्रमागाचे प्रकार

हातमाग : हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार आहेत
इतर : यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग असे इतर दोन प्रकार आहेत.

शेणोली गावातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांची यशोगाथा


अशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली.
प्रथम त्यांनी प्रत्येकी दरमहा 500 रूपये जमा करून अल्प बचत योजना सुरू केली. या करीता त्यांनी बँक ऑॅफ महाराष्ट्र, शाखा - शेणोली येथे बचत गटाचे स्वंतत्र खाते सुरू केले. त्या खात्यामध्ये वर्षाला 78 हजार रूपये जमा होऊ लागले व यातुनच त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. व संगोपनगश्ह बांधणी करीता बचत रक्कमेतुन पैसे घेतले.
बँक अधिकाऱ्यांनी सदर योजनेस प्रोत्साहन म्हणुन 60 हजार फिरते भांडवल 1ध्4सी. सी.1ध्2 दिले. सदर रकमेमुळे प्रत्येकाचे स्वंतत्र संगोपनगश्ह निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकाला रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास 50 एकरवर तुतीची लागवड झाली. कराड तालुक्यातील शेतकरी रेशीम उद्योग पहाण्याकरीता शेणोली गावामध्ये येऊ लागले.
संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकरीता आवश्यक असणारे साहित्य व औषधे वाजवी दराने स्थानिक पातळीवर लवकरच उपलब्ध होण्याचे दश्ष्टीने विक्री केंद्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे सुशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन रेशीम उद्योग केल्यास त्यांची निश्चितच अर्थिक उन्नति होईल.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment