- डॅनिअल रूबेन
येत्या काळात जगभरात इंधनाची समस्या वाढत जाणारी आहे. घरातील लोकांची संख्या जशी वाढते तशी जळाऊ ऊर्जाही जास्त लागते. स्वयंपाकासाठी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घरातील मुलींची आणि बायकांची उन्हा-तान्हात वणवण होत असते, काही वेळा पैसे मोजून जळाऊ लाकडे, रॉकेल विकत आणावे लागते. ही वणवण, त्रास आणि खर्च कमी करण्याचा आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे शेतात तयार होणारा टाकाऊ जैवभारापासून कोळसा घरीच बनवणे. हा कोळसा बनविण्याची कृती सोपी आहे, लागणारा कच्चा मालही तुमच्यापाशी आहे. दर वर्षी तयार होतो. शेतावर तयार होणाऱ्या हजारो टन कचऱ्यापासून तो बनवता येतो. पुण्यातील ऍप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) यांनी संशोधलेली आणि बनवलेली साधीसुधी भट्टी वापरून 15 ते 20 मिनिटांत एक बॅच कोळसा तयार करता येतो.
सध्या पिंपांपासून बनवलेली भट्टी वापरायला अगदी सोपी आहे. त्यांनी विकसित केलेल्या तंत्राप्रमाणे जैवभार (टाकाऊ शेतमाल) पिंपाच्या भट्टीत भरायचा; वरून पेटवून घ्यायचे आणि वर झाकण आणि धुराटे लावायची. ठराविक वेळेनंतर धुराटे आणि झाकण काढायचे; अचानक मिळणाऱ्या प्राणवायूमुळे लागणारी आग विझवायची आणि कोळसा थंड होऊ द्यायचा.
या भट्टीमध्ये उसाचे पाचट किंवा पालापाचोळा 6 ते 7 किलो, तुराट्या पराट्या 10 ते 12 किलो आणि कागद पुठ्ठे 5 किलो या भट्टीमध्ये मावतात, टाकलेल्या जैवभाराच्या वजनाने 1/3 एवढा कोळसा मिळतो. शेतातील काडीकचरा, गवत, कागद, पुठ्ठे, उसाचे पाचट वगैरे कोणताही माल चालतो, अट फक्त एक माल सुकलेला हवा.
मिळणारा कोळसा मालाप्रमाणे भुकटी किंवा तुराट्याच्या आकाराचा असतो. तो इंधन म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी त्याच्या योग्य मापाच्या वड्या (ब्रिकेट्स) बनवाव्या लागतात. त्यासाठी 10 किलो कोळश्यात एक किलो खळ चांगली मिसळून हे मिश्रण ब्रिकेटिंग मशीनमधून काढायचे. या ब्रिकेट्स तयार करणाऱ्या यंत्र मिळते किंवा जास्त मोठ्या प्रमाणात ब्रिकेट्स बनवण्यासाठी विजेवर किंवा डिझेल इंजीनवर चालणारी यंत्रे मिळतात.
स्त्रोत: अग्रोवन

0 comments:
Post a Comment