"पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा' याच ओळीतून प्रेरणा घेत
गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण जिल्ह्यातील चांदाळा येथील शंकर गद्देकार नामक
युवकाने वराहपालनाला मोठी गती दिली आहे. जिल्ह्यात वराहाच्या मांसाला
असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्याने व्यवसायाचे नियोजन केले आहे. या
व्यवसायात संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांनाही
व्यवसायाचा फायदा मिळवून देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा
लागेल.
गडचिरोली जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शिक्षणाचा विकास होण्यास वाव आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख हेक्टर वनक्षेत्र आहे. शेतीक्षेत्र कमी आहे. तरीही चांदाळा (ता. जि. गडचिरोली) येथील शंकर गद्देकार या तरुणाने वराहपालन व्यवसायाची जपणूक करीत जिल्ह्यातील शेतीचा विकास करण्यात महत्त्वाचा हातभार लावला आहे.
शंकर यांच्या कुटुंबातील सदस्य दररोज चांदोळा गावात किंवा गडचिरोली येथील निवासी आश्रमशाळांमध्ये जाऊन तेथील शिल्लक वा शिळे अन्न आणतात. हेच खाद्य वराहांना दिले जाते. सध्या बंदिस्त पद्धतीने वराहपालन केले जाते. पांढऱ्या रंगाच्या वराहांच्या तुलनेत आंध्र प्रदेशातून आणलेले वाण आपल्या भागातील वाढीसाठी अधिक अनुकूल असल्याचे शंकर म्हणतात. वराहांना पाणीही भरपूर प्रमाणात लागते.
- मांस (सुमारे 70 ते 75 किलो वजनाच्या वराहाचे) - सध्याचा दर - 180 रुपये प्रति किलो. (हाच दर आधी 120 रुपयांपर्यंत होता.)
खर्च वजा जाता वर्षाला एक ते दोन लाख रुपये नफा शंकर यांना मिळतो. तर संस्थेला चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराहांचे वाटप करण्यात आले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर हे वराह देण्यात आले. चार लाख 80 हजार रुपये या व्यवहारातून संस्थेला मिळाले. संस्थेतील सदस्यांपैकी सुमारे 100 जणांकडे तरी वराहपालन सुरू झाले आहे. शंकर यांना भाचा संजय नागन्ना कंदेलवार, राजू भोयर, पत्नी मैना गद्देकार, मिरा कंदेलवार, विजय कंदेलवार, मुलगा किशोर गद्देकार यांची व्यवसायात मदत होते.
2) अति दुर्गम भागात राहून हिमतीने पूरक व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या शंकर यांच्या कार्याची दखल घेत दूरदर्शनच्या वतीने त्यांना "सह्याद्री' पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.
संपर्क - शंकर गद्देकार - 9689248382.
- डॉ. हेमंत बिराडे - 9821187497.
सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. पुणे
स्त्रोत: अग्रोवन
गडचिरोली जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शिक्षणाचा विकास होण्यास वाव आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख हेक्टर वनक्षेत्र आहे. शेतीक्षेत्र कमी आहे. तरीही चांदाळा (ता. जि. गडचिरोली) येथील शंकर गद्देकार या तरुणाने वराहपालन व्यवसायाची जपणूक करीत जिल्ह्यातील शेतीचा विकास करण्यात महत्त्वाचा हातभार लावला आहे.
वराहपालनाचे घेतले शास्त्रोक्त प्रशिक्षण
जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील तज्ज्ञांच्या संपर्कात शंकर कायम असायचे. तेथील विषय विशेषज्ञ संदीप कऱ्हाळे यांनी त्यांना वराहपालनाची माहिती दिली. तेथूनच शंकर यांच्या शेतीत परिवर्तन होण्याचा मार्ग मिळाला. याच विज्ञान केंद्रामार्फत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात शंकर आले. तेथील तज्ज्ञांमार्फत आपल्याच जिल्ह्यात पाच दिवसांचे वराहपालन प्रशिक्षण घेण्याची संधी शंकर यांनी घेतली. वराहपालन व्यवसायाला जिल्ह्यात मोठी चालना मिळावी यासाठी त्यांच्या पुढाकाराने कैकाडी समाज बहुद्देशीय विकास मंडळ व स्व आधार वराहपालन सहकारी संस्था सुरू झाली. संस्थेचे शंकर अध्यक्ष आहेत. संस्थेचे एक हजार सदस्य आहेत. शंकर यांच्यासह सुमारे 60 जणांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.व्यवसाय नेटाने चालवला
प्रशिक्षणानंतर शंकर यांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन व्यवसाय सुरू केला. त्याचे भाडे पाच हजार रुपये प्रति महिना आहे. शंकर यांना प्रशिक्षणावेळी व्हाइट यॉर्कशायर जातीच्या वराहाची पिल्ले देण्यात आली होती. त्यांचे संगोपन सुरू केले. सुरवातीला स्वाइन फ्लू रोगामुळे 62 वराह दगावले. त्यानंतरही व्यवसायात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. मंचेरियाल (आंध प्रदेश) येथूनही काही वराह खरेदी केले. त्यांची पैदास आपल्या वराहपालन शेडमध्ये केली.वराहपालनातील महत्त्वाच्या बाबी
शंकर यांच्याकडे सध्या वराहांची 80 पर्यंत संख्या आहे. 19 पिल्ले आहेत. वराह मादी वर्षातून दोन वेळा पिल्ले देते. पिलांची संख्या सुमारे आठपर्यंत राहते. पिल्लू जन्मल्यापासून सहा महिन्यांत वराहाचे सरासरी 75 किलोपर्यंत वजन वाढते. त्या वेळी जिवंत वराह किंवा मांसाची विक्री केली जाते.शंकर यांच्या कुटुंबातील सदस्य दररोज चांदोळा गावात किंवा गडचिरोली येथील निवासी आश्रमशाळांमध्ये जाऊन तेथील शिल्लक वा शिळे अन्न आणतात. हेच खाद्य वराहांना दिले जाते. सध्या बंदिस्त पद्धतीने वराहपालन केले जाते. पांढऱ्या रंगाच्या वराहांच्या तुलनेत आंध्र प्रदेशातून आणलेले वाण आपल्या भागातील वाढीसाठी अधिक अनुकूल असल्याचे शंकर म्हणतात. वराहांना पाणीही भरपूर प्रमाणात लागते.
मार्केट व विक्री व्यवस्था
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, छत्तीसगडी, बंगाली व घुराव असे चार प्रकारचे समुदाय आहेत. ते सर्व वराहांचे मांस मोठ्या प्रमाणात खातात. सणसमारंभातही त्यांच्याकडे हे मांस उपलब्ध असते. चांगले वजन वाढलेल्या वराहांच्या किंवा मांसाच्या विक्रीसाठी जिल्ह्यात सुमारे 150 बाजारपेठा आहेत. त्यामुळे मार्केटची चिंता शंकर यांना नाही. त्यांचे स्वतःचेही विक्री केंद्र आहे.असे असतात दर
जिवंत वराह विक्री -- मांस (सुमारे 70 ते 75 किलो वजनाच्या वराहाचे) - सध्याचा दर - 180 रुपये प्रति किलो. (हाच दर आधी 120 रुपयांपर्यंत होता.)
खत म्हणून वराह विष्ठेची विक्री
शंकर गद्देकार यांनी आत्तापर्यंत सुमारे एक ते दीड टन वराह विष्ठेची खत म्हणून पाच रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री केली आहे.खर्च वजा जाता वर्षाला एक ते दोन लाख रुपये नफा शंकर यांना मिळतो. तर संस्थेला चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराहांचे वाटप करण्यात आले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर हे वराह देण्यात आले. चार लाख 80 हजार रुपये या व्यवहारातून संस्थेला मिळाले. संस्थेतील सदस्यांपैकी सुमारे 100 जणांकडे तरी वराहपालन सुरू झाले आहे. शंकर यांना भाचा संजय नागन्ना कंदेलवार, राजू भोयर, पत्नी मैना गद्देकार, मिरा कंदेलवार, विजय कंदेलवार, मुलगा किशोर गद्देकार यांची व्यवसायात मदत होते.
शंकर यांच्या कार्याची दखल
1) शंकर यांचा व्यावसायिक दृष्टिकोन पाहता रोजगार निर्मितीची संधी म्हणून नाबार्डने या व्यवसायाला परिसरात चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुरखेडा व धानोरा तालुक्यातील 60 गावे याप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहांना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. समूहांद्वारे वराह पालन करून बाजारपेठ उपलब्ध करण्याचे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे.2) अति दुर्गम भागात राहून हिमतीने पूरक व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या शंकर यांच्या कार्याची दखल घेत दूरदर्शनच्या वतीने त्यांना "सह्याद्री' पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.
- डॉ. हेमंत बिराडे - 9821187497.
सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. पुणे
स्त्रोत: अग्रोवन
0 comments:
Post a Comment