सोलर टनेल ड्रायरबाबत

सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे.
1) सोलर टनेल ड्रायर अर्धदंडगोलाकार, 3 x 6 मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.
2) 25 मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.
3) टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनविलेला आहे, त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.
4) अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (200 मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.
5) सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा "ग्रीन हाऊस इफेक्‍ट'मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 15 ते 20 अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते 60 ते 65 अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.
6) वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.
7) ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.
8) या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

डॉ. सुरेंद्र काळबांडे - 7588763787
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जास्रोत योजना,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment