नागपुरी संत्र्याला मागणी

नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये लहान, मध्यम, मोठा अशा पद्धतीने तीन प्रकारात स ंत्र्याची प्रतवारी होते. अ' दर्जाचा संत्रा टेबलफ्रूट म्हणून परराज्यांतील बाजारपेठेत पाठ विला जातो. याला चांगली मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये संत्र्याची विक्री होत आहे. येत्या काळात संत्र्याला चांगला दर मिळण्यासाठी विक्री व्यवस्थापन तंत्रामध्ये आणि निर्यातीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नागपुरात कुणी आलं आणि संत्र्याची चव चाखली नाही असे क्वचितच होते. कुणी नागपुरी संत्र्याचा आस्वाद घेईल तर कुणी संत्र्याची बर्फी चाखेल. अशा या फळाला यंदाच्या परिस्थितीमध्ये चांगला दर मिळतो आहे. संत्र्याचा दर्जा आणि मागणीत वाढ झाल्याने यंदा संत्र्याला प्रति क्विंटल विक्रमी चार हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे.
विदर्भात सुमारे सव्वालाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. विदर्भातील निम्म्याहून जास्त संत्राउत्पादन अमरावती जिल्ह्यात होते. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात संत्राउत्पादन होते. वर्धा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतही काही भागांमध्ये सं त्र्याच्या बागा आहेत. संत्राउत्पादक मृग आणि आंबिया बहराचे नियोजन करतात. या मध्ये प्रामुख्याने मृग घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बाजारातील दरानुसार फळांची तोडणी होते. विदर्भातील हवामान संत्र्याला पूरक असून, देशात सर्वाधिक आणि दर्जेदार संत्राउत्पादन होणारा प्रांत म्हणून विदर्भाची ओळख आहे.
नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये लहान, मध्यम, मोठा अशा पद्धतीने तीन प्रकारात संत्र्याची प्रतवारी होते. अत्यंत छोट्या आणि दर्जा नसलेल्या संत्र्याला चुरा (थुल्ली) म्हणतात. "अ' दर्जाचा संत्रा "टेबलफ्रूट' म्हणून परराज्यातील बाजारपेठेत पाठविला जातो. याला चांगली मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. गेल्या काही वर्षांत योग्य प्रकारे पॅकिंग करून परराज्याबरोबर विदेशातही संत्र्याची व्यापाऱ्यांकडून खासगी निर्यात होते. सर्वसाधारणपणे मध्यम आकाराची फळे गाव, शहरातील बाजारांमध्ये विकली जातात. लहान आकारातील फळे प्रक्रियेकरिता वापरली जातात. नागपुरातील कॉटन मार्केट परिसरात "संत्रा मंडी' म्हणून फळांचा उपबाजार भरतो, तसेच सीताबर्डी येथील फळांचा उपबाजार विशेष करून संत्र्याकरिता प्रसिद्ध आहे. शहर, तसेच जिल्ह्यातून आलेले छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, ग्राहक येथूनच फळांची खरेदी करतात. गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये संत्र्याची विक्री होत आहे. संत्रा मंडीत कोरूगेटेड बॉक्‍स, लाकडी पेट्या आणि कंटेनर्समधून संत्रा विकला जात आहे. सध्या विदर्भात सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या कळमना मार्केटमध्ये यंदा प्रति क्विंटल 3800 रुपये असा दर मिळाला. परराज्यांतील बाजारपेठांमध्ये अजूनही संत्रा व्यापाऱ्यांच्याच माध्यमातून पाठविला जात आहे. येत्या काळात शेतकऱ्यांच्या गटां नीदेखील या बाजारपेठेत स्वतः उतरले पाहिजे.

मार्केटिंग'चे आव्हान

राज्यातील संत्राउत्पादकांचे प्रश्‍न आणि समस्या मांडण्यासाठी आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून घेण्यासाठी संत्राउत्पादक संस्था आणि संघटनांचा समावेश असलेला महासंघ "महाऑरेंज' शासनाच्या पुढाकाराने स्थापन झाला. यानंतर नागपूर, पुणे, मुं बईला संत्रामहोत्सव घेण्यात आले. महाऑरेंज'चे कार्यालयही नागपुरात सुरू होऊन काही प्रमाणात कार्यशाळा, बैठका, चर्चासत्रे, मेळावेही पार पडले, मात्र अजूनही सं त्राउत्पादक आणि संस्था, संघटना, यंत्रणा एकमेकांपर्यत प्रभावीपणे पोचू शकल्या नाहीत. संत्राउत्पादकांचे अभ्यासदौरे, संत्रा बाजारपेठ, प्रक्रियाप्रकल्प होणे महत्त्वाचे आहे.

प्रक्रिया उद्योगातून चांगली मागणी

ऑरेंज ज्यूस'ला स्थानिक बाजारांसह परराज्यांतून चांगली मागणी असते, परंतु मागणीचा विचार करता संत्र्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू झालेले नाहीत. शहरी भागात ज्यूस पार्लरमध्ये संत्र्याच्या ज्यूसला विशेष मागणी असते. संत्रा फ्लेवर्स, पावडर, जॅम, जेली, मार्मालेड, बिस्कीट, केक, चॉकलेट्‌स, केक, गोड पदार्थ आदी उत्पादकांकडनही संत्र्याला मागणी वाढते आहे. संत्रा ज्यूससह संत्र्याची बर्फी, तसेच स ंत्र्यापासून बनविलेल्या विविध मिठाईंच्या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. संत्र्याचा इसेन्स' बनविण्यासाठी खासगी उद्योगसमूहांनी पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्यात संत्रा "स्क्‍वॅश'ला देखील चांगली मागणी असते

कॉर्पोरेट उद्योगसमूहांकडून मागणी

विदेशात संत्रा गोडीने चाखला जातो, मात्र मागणीनुसार दर्जेदार संत्र्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. विशेष करून आंबट-गोड चव असलेल्या नागपुरी संत्र्याला विशेष मागणी असते. संत्र्याचे "मार्केटिंग' करण्यासाठी अनेक यंत्रणा देशात कार्यरत आहेत. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकरिता अर्थसाहाय्य देऊ केले असून, त्यासाठी सर्वेक्षणदेखील सुरू केले आहे. विदर्भातील अनेक प्रयोगशील संत्राउत्पादकां कडे कंपन्यांनी मागणी नोंदविण्यास सुरवात केली आहे. एन.डी.डी.बी.ने दिल्लीमध्ये संत्र्याचे स्टॉल्सदेखील सुरू केले आहेत. दर्जेदार संत्र्याला देशातच नव्हे तर जगात मोठी मागणी आहे. संत्र्याला देशपातळीवरील बाजारपेठेत नेण्यासाठी "महाऑरेंज' या संस्थेचे प्रयत्न सुरू असून, शासनाचे पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याची अपेक्षा "महाऑरेंज'चे अध्यक्ष श्रीधरराव ठाकरे यांनी व्यक्त केले. संत्रा उत्पादकांच्या मागण्या काटोल येथील संत्रा उत्पादक संस्थेचे सचिव मनोज जवंजाळ म्हणाले, की विदर्भात संत्र्याकरिता कळमेश्‍वर, काटोल, वरुड, कारंजा, अमरावती, मोर्शी या बाजारपेठा ओळखल्या जातात. या बाजारपेठांच्या बरोबरीने संत्रा उत्पादक क्षेत्रात नव्या बाजारपेठा विकसित होणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघटनेचे संचालक रमेश जिचकार म्हणाले, की गेल्या काही वर्षांत संत्रा बागेच्या व्यवस्थापनामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. येत्या काळात उत्पादनात सातत्य टिकविण्यासाठी तंत्रशुद्ध लागवड आणि व्यवस्थापनाकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.प्रयोगशील संत्रा उत्पादक सुनील शिंदे म्हणाले, की येत्या काळात जागतिक बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कृषी पणन मंडळातर्फे निर्यातीला चालना मिळाली पा हिजे. तंत्रशुद्ध लागवडीपासून ते आधुनिक मार्केटिंगची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी लागणार आहे. आज संत्राउत्पादकांचा दबाव गट तयार होणे गरजेचे असून त्यास राजकीय पाठबळ मिळणेदेखील महत्त्वाचे आहे.


नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती,0712-2680280 कृषी पणन मंडळ, नागपूर, 0712- २५६१४५३
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नागपूर (एन.एच.एम.) : 0721-2662034
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र, नागपूर, : 0712-2500440
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment