धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि
हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते. धिंगरी अळिंबीची लागवड
शेतातील पिकांच्या मळणीनंतर निरुपयोगी अशा वाळलेल्या काडावर व
पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुख्यतः भात व गव्हाचे काड, ज्वारी,
बाजरी, मका यांची ताटे व पाने, सोयाबीन व तूर यांच्या काड्या, भुईमुगाच्या
शेंगांची टरफले इत्यादी वाळलेल्या काडाचा व पालापाचोळ्याचा वापर करता येतो.
लागवडीसाठी लागणारे काड व पालापाचोळा हे माध्यम चालू हंगामातील व न
भिजलेले असावे. धिंगरी अळिंबीची लागवड प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये केली
जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या पिशव्या वापरल्या जातात. अळिंबीचे
शुद्ध बियाणे (स्पॉन) खात्रीशीर संस्थेकडून लागवडीपूर्वी एक-दोन दिवस आणून
ठेवावे. अळिंबी उत्पादनासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
संपर्क - 020 - 25537033
अळिंबी सुधार प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे
संपर्क - 020 - 25537033
अळिंबी सुधार प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे
0 comments:
Post a Comment