पारंपरिक
पद्धतीने कांद्याची साठवण केल्यास वजन घटते, कोंब फुटतात, काही वेळा
कांदे सडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. होणारे नुकसान लक्षात घेऊन
येत्या काळात शास्त्रीय पद्धतीने कांद्याची साठवण करावी. साठवण करताना
योग्य काळजी घेतली तर निश्चितपणे कां द्याचा दर्जा चांगला राहतो.
एस. बी. तांबे, डॉ. बी. एम. कापसे
राज्यातील एकूण, कांदा उत्पादनापैकी खरिपामध्ये 40 टक्के तर रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये 60 टक्के असे उत्पादन होते. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याच्या सोई नाहीत. त्यामुळे असेल त्या भावात कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कांद्याची साठवण. साधारणपणे तीन ते पाच महिन्यांपर्यंत कांदा साठवण करून पावसाळ्यामध्ये (जून-ऑक्टोबर) जेव्हा कांद्याला सर्वोच्च भाव असतो तेव्हा विक्री करावी. यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो.
पावसाळ्यामध्ये आर्द्रता 95 टक्क्यापर्यंत असते. पाऊस सुरू असतानाची ही अति उच्च आर्द्रता साठवलेल्या कांद्याच्या ढिगामध्ये असलेल्या पोकळीमध्ये शिरते. यामुळे तसेच पावसाळ्यातील पोषक तापमानामुळे ढिगामध्ये साठवलेल्या कांद्यास कोंब येतात व कांदे खराब होतात. हे टाळण्यासाठी पाऊस उघडल्यानंतर ढिगामधील आर्द्रता बाहेर पडणे आवश्यक आहे. यासाठी हवा खेळती राहणे आवश्यक असते. पाऊस उघडल्यानंतर वातावरणातील खेळत्या हवेमुळे साठविलेल्या कांद्याच्या ढिगातील आर्द्रता निघून जाते. चाळीमध्ये कोरड्या वातावरणाची निर्मिती व्हावी व कोंब फुटण्याच्या क्रियेला आळा बसावा, अशी शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या कांदा चाळीची आखणी असते.
एस. बी. तांबे, 7588531906
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन

कांदा चाळ बांधणी (क्षमता 25 टन)
पूर्वनियोजन
- कांदा चाळीसाठी उंचावरील किंवा माथ्यावरील जेथे पाणी साठणार नाही, तसेच वाहतुकीसाठी सोयीची अशीच जागा निवडावी.
- कांदा चाळीची लांबी ही नेहमी वाऱ्याच्या दिशेला काटकोनात छेदणारी म्हणजे दक्षिणोत्तरच असावी.
- कांदा चाळीच्या वर-खाली तसेच दोन्ही बाजूंनी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- कांदा चाळीच्या आजूबाजूला वारा अडवणारे कोणतेही बांधकाम नसावे.
- थंड तापमानात कांद्याचा साठवण काळ वाढतो, यासाठी झाडांची सावली असेल तर फायद्याचे ठरते.
चाळ बांधणी
- कांदा चाळीचा पाया हा जमिनीपासून 1.5 ते 2 फूट उंच ठेवावा. यासाठी सिमेंटचे, लोखंडाचे किंवा लाकडी 1.5 ते 2 फूट उंचीचे कांदा चाळीचा भार पेलू शकणारे खांब समान अंतरावर उभारावेत, त्यावर कांदाचाळ बांधावी.
- 25 मे. टन क्षमतेसाठी 12 मीटर लांब व 3.60 मीटर रुंद या आकाराची चाळ असावी.
- 3.60 मीटर रुंदीचे 1.20 मीटरचे तीन समान हिस्से करावेत. कडेच्या दोन्ही हिश्श्यांमध्ये का ंद्याची साठवण करावी व मधला हिस्सा हवा खेळती राहण्यासाठी रिकामाच ठेवावा.
- 12 मीटर लांबीचे 3.00 मीटरचे चार समान कप्पे करावे. म्हणजेच दोन्ही बाजूंचे प्रत्येकी चार असे एकूण आठ कप्पे होतील, यामध्ये कांदे साठवावेत.
- छपराला आधार देण्यासाठी सिमेंट किंवा लोखंडी खांब किंवा लाकडी बांबू समान अंतरावर रोवावेत.
- पायापासून 1.80 मीटर एवढी चाळीची उंची असावी. त्यावर दोन्ही बाजूंना 0.80 - 1.0 मीटरचा उतार निघेल अशा प्रकारचे छप्पर टाकावे.
- छपरासाठी मंगळुरी कौले सर्वांत उत्तम पण सिमेंटचे पत्रे वापरण्यास हरकत नाही.
- कडेच्या भिंती या लाकडी फळ्यांच्या (कमाल पाच सें.मी. रुंद) किंवा बांबूच्या असाव्यात दोन फळ्यांमधून कांदे बाहेर पडणार नाहीत. एवढे अंतर ठेवून फळ्या बसवाव्यात. भिंतीसाठी लोखंडाच्या जाळीचाही पर्याय होऊ शकतो.
- छप्पर हे चाळीच्या दोन्ही भिंतीपासून एक मीटर बाहेरपर्यंत येईल एवढ्या रुंदीचे असावे.
- उष्णतारोधक पदार्थ की उसाचे पाचट गव्हाचा कोंडा, सरमड किंवा वाळलेले गवत यांचा छपरावर थर द्यावा.
काही महत्त्वाच्या सूचना
- कांदा चाळीमध्ये साठवण करावयाच्या कांद्याची काढणी कांदापात पूर्ण पडल्यानंतर म्हणजे कांदा पूर्णपणे तयार झाल्यानंतरच करावी.
- प्रतवारीकरून कांदा चाळीत भरावा.
- कांदा काढणी अगोदर जर पाऊस आला असेल तर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढणी अगोदर शिफारशीत बुरशीनाशक तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारावे.
- कांदा काढणीनंतर सावलीमध्ये व्यवस्थित वाळवावा आणि मगच चाळीत साठवण करावी.
- नैसर्गिकपणे हवा खेळती राहण्यासाठी चाळीची रुंदी प्रमाणातच असावी.
- छरासाठी लोखंडी पत्रे वापरू नयेत.
- पावसामध्ये वाऱ्याच्या दिशेकडील बाजू झाकण्याची व्यवस्था करावी.
- याप्रकारे 25 टन क्षमतेची कांदा चाळ बांधण्यासाठी सर्वसाधारणपणे एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो, परंतु घरगुती पर्यायी वस्तू वापरून हा खर्च निम्म्यावर आणता येतो.
- राष्ट्रीय फलोद्यान मंडळ व महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून कांदा चाळीसाठी अनुदान उपलब्ध आहे.
एस. बी. तांबे, 7588531906
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
0 comments:
Post a Comment