गळिताची पिके-ज्यांच्या बियांपासून तेल
काढण्यात येते अशी वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणारी)
पिके. तेलांचे खाद्य तेले आणि अखाद्य तेले असे दोन प्रकार असतात. खाद्य
तेलांपैकी काही तशीच स्वयंपाकात वापरतात; काहींच्यावर प्रक्रिया करून
रूपांतर केल्यानंतर ती खाण्यासाठी वापरतात. उदा., भुईमुगाचे आणि सोयाबीनाचे
तेल.
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा,
मोहरी, जंबो, करडई, सोयाबीन, कपाशी वगैरे हंगामी पिकांपासून तसेच
बहुवर्षायू नारळाच्या खोबऱ्यापासूनही खाद्य तेल काढतात.
अखाद्य तेल पिके-एरंडी, जवस ही वर्षायू
पिके आणि करंज, कडूनिंब, मोहवा हे मोठे बहुवर्षायू वृक्ष आहेत. एरंडीचे तेल
वंगणासाठी (विशेषतः विमानांच्या वंगणासाठी) उत्कृष्ट समजतात. जवसाचे तेल
हवेत झटपट वाळते म्हणून त्याचा उपयोग रंग व रोगणात करतात. करंज
वगैरेंसारख्या झाडांच्या बियांचे तेल औषधी म्हणून आणि साबणाच्या धंद्यात व
वंगणासाठीही वापरतात.
पहा: अळशी; एरंड; करंज; करडई; कारळा; तीळ; नारळ; भुईमूग; मोहरी; सरकी; सूर्यफूल; सोयाबीन.
0 comments:
Post a Comment