यांत्रिक पद्धतीने दुधाचे कॅन (milk can), बाटल्या (milk Bottle), दूधप्रक्रिया यंत्रांची व उपकरणांची एकसारखी स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळी स्वच्छता यंत्रे वापरली जातात. यामुळे मनुष्यबळ (man power) कमी लागून स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या खर्चात 25 टक्क्यांपेक्षा जास्त बचत होते.
दुधाचे कॅन व बाटल्या स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी यांत्रिक पद्धत वापरली जाते. कॅन व त्याची झाकणे पुढीलप्रकारे स्वच्छ व निर्जंतुक केली जातात.
दुधाचे कॅन व बाटल्या स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी यांत्रिक पद्धत वापरली जाते. कॅन व त्याची झाकणे पुढीलप्रकारे स्वच्छ व निर्जंतुक केली जातात.
- द्रव दुधाचे(liquid milk) अवशेष निघून जाण्यासाठी कॅन नितळावेत (clean can).
- थंड किंवा कोमट पाण्याच्या फवाऱ्याने विसळून त्यानंतर नितळावेत.
- कॅनमध्ये डिटर्जंटच्या 70 अंश सेल्सिअस (0.5 टक्क्यापेक्षा कमी अल्कधर्मीय) पाण्याच्या द्रावणाची फवारणी करून सोडून कॅन स्वच्छ करावा.
- 88 ते 93 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याची फवारणी करावी.
- पाण्याची वाफ कॅनमध्ये फवारावी.
- 95-115 अंश सेल्सिअसची गरम हवा वापरून कॅन कोरडे करावेत.
यांत्रिक पद्धतीने बाटल्यांची स्वच्छता(Cleanliness of bottles in mechanical manner)
- नितळल्यानंतर 32 ते 38 अंश सेल्सिअसच्या पाण्याने विसळाव्यात.
- डिटर्जंटच्या (1 ते 3 टक्के धुण्याचा सोडा) द्रावणाने 60 ते 75 अंश सेल्सिअस दरम्यानच्या दोन टप्प्यांत बाटल्या स्वच्छ कराव्यात.
- डिटर्जंटचे शिल्लक अवशेष काढून टाकण्यासाठी 25 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याने विसळाव्यात.
- 35 ते 50 पीपीएम उपलब्ध क्लोरिनच्या थंड द्रावणाने विसळाव्यात.
- बाटल्या यंत्रातून बाहेर आल्यानंतर नितळण्यासाठी ठेवल्या जातात.
यांत्रिक पद्धतीचे फायदे(Benefits of mechanical method)
- जागा कमी लागते.
- मनुष्यबळ कमी लागते.
- वेळेची बचत होते.
सीआयपी पद्धत(CIP Method)
यंत्रांचे व उपकरणांचे भाग सुटे न करता त्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आहे त्या जागीच केली जाते.
फायदे (Benfits)
- मानवी हस्तक्षेप होत नसल्यामुळे यंत्राच्या संपूर्ण भागाची एकसारखी स्वच्छता व निर्जंतुकीकरण दिवसेंदिवस होत राहते.
- दररोज करावी लागणारी यंत्राचे भाग सुटे करून परत जोडण्याची प्रक्रिया टाळल्यामुळे यंत्राची हानी कमी होते.
- स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या खर्चात 25 टक्क्यांपेक्षा जास्त बचत होते, मनुष्यबळ कमी लागते.
- मानवी चुकांमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गाची शक्यता कमी होते.
- दुग्धप्रक्रिया प्रकल्पाच्या उपयोगीतेत वाढ होते.
सीआयपी पद्धतीची यशस्विता
- पाइप व संबंधित भागांची योग्य निवड, उपकरणांची योग्य स्थापना व पाइपच्या मार्गाची योग्य निर्मिती.
- स्वच्छतेच्या द्रावणांचे योग्य तापमान.
- स्वच्छतेच्या द्रावणाचा योग्य वेग.
- खास निर्माण केलेल्या डिटर्जंटचा वापर.
- डिटर्जंट द्रावणाची योग्य तीव्रता.
- स्वच्छतेसाठीचा पुरेसा वेळ.
सीआयपी पद्धतीने एचटीएसटी पाश्चरीकरण संयंत्राची स्वच्छता(Hygiene of HTST Pasteurization Plant by CIP Method)
- संयंत्रातील शिल्लक दुधाचे अवशेष संपून स्वच्छ पाणी बाहेर येईपर्यंत थंड किंवा कोमट पाणी प्रवाहित करावे.
- 0.15 ते 0.60 टक्के आम्लतेचे फॉस्फोरिक/ नायट्रिक आम्लाचे द्रावण प्रवाहित करून 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानास 20 ते 30 मिनिटे पुनर्प्रवाहित करावे.
- आम्लाचे द्रावण नितळणे यासाठी स्वच्छ पाणी प्रवाहित करावे.
- 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानाचे स्वच्छ पाणी 5 ते 7 मिनिटे प्रवाहित करून नितळावे.
- 0.15 ते 0.60 टक्के तीव्रतेचे अल्कधर्मीय डिटर्जंट द्रावण प्रवाहित करून 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानास 20 ते 30 मिनिटे पुनर्प्रवाहित करावे.
- अल्कली द्रावण नितळणे यासाठी स्वच्छ पाणी प्रवाहित करावे.
- संपूर्ण यंत्रणा गरम होईपर्यंत 71 ते 82 अंश सेल्सिअस तापमानाचे स्वच्छ पाणी प्रवाहित करून नितळणी करावी.
- नितळण्यासाठी व कोरडे होण्यासाठी पाश्चरीकरण संयंत्राच्या पट्ट्या काहीशा सैल कराव्यात.
- नियमित कालावधीच्या अंतराने उपकरणाचे भाग सुटे करून काळजीपूर्वक स्वच्छता तसेच दुधाच्या संपर्कात येणाऱ्या संपूर्ण पृष्ठभागाचे निरीक्षण करावे.
दुधाची साठवण टाकी, टॅंकरची सीआयपी पद्धतीने स्वच्छता(Milk storage tank, tanker cleanliness by CIP method)
दुधाची साठवण टाकी व टॅंकरची सीआयपी पद्धतीने स्वच्छता करताना संपूर्ण पृष्ठभागावर डिटर्जंटच्या द्रावणाची एकसारखी फवारणी होण्यासाठी खास प्रकारची फवारणी उपकरणे वापरली जातात. स्वच्छता करण्यासाठी पुढील प्रक्रिया केली जाते.- थंड पाण्याने धुऊन व 3 ते 5 मिनिटे निथळावीत.
- 0.35 ते 0.50 टक्के तीव्रतेच्या 70 अंश सेल्सिअस तापमानाच्या सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाने 15 ते 20 मिनिटे धुवावे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा आम्ल व अल्कली वापरावी.
- 3 ते 5 मिनिटे नितळणी करावी.
- 65-70 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याने धुवावे. त्यानंतर 3 ते 5 मिनिटे नितळावे.
- 90 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी 2 ते 3 मिनिटे किंवा 150 ते 200 पीपीएम उपलब्ध क्लोरिनचे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाचे द्रावण 1 ते 2 मिनिटे वापरून निर्जंतुकीकरण करावे.
- 3 ते 5 मिनिटे नितळणी करावी.
- 1 ते 2 मिनिटे गरम हवा दाबाखाली प्रवाहित करावी.
संपर्क - डॉ. बी. आर. कदम, 9762505866
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
0 comments:
Post a Comment