तुती उगविण्‍याची नवीन पध्‍दत


Tuti fertilization

रस्तावना

रेशीम कीटक-संगोपनात, रेझ्ड किंवा फ्लॅट बेड पध्‍दतीचा वापर करून तुतीच्‍या बालवृक्षाचे व्‍यावसायिक उत्‍पादन करतात.
अंकुरणाची यशस्‍वि‍ता आणि रोपाची/बालवृक्षाची शक्‍ती ह्यांच्‍यावर रानपाला, मातीची आर्द्रता आणि मृदा तपमान यांच्‍याशी प्रतिस्पर्धा करावी लागल्‍यामुळे फार प्रभाव पडत आहे. सध्‍या रानपाला खुडण्‍यासाठी श्रमिकांची उपलब्‍धता व त्‍यावरील खर्च हे अवरोध म्‍हणून सामोरे आलेले असल्‍यामुळे, ह्या समस्‍यांवर मात करण्‍यासाठी तुतीची रोपे पॉलिथिन शीटचा वापर करून तयार करण्‍याच्‍या नवीन पध्‍दतीचा विकास करण्‍यात आलेला आहे, जो तुतीच्‍या गुणवत्तायुक्‍त रोपट्यांच्‍या यशस्‍वी व्‍यावसायिक उत्‍पादनात प्रत्‍यक्ष स्‍वरूपात फार प्रभावी ठरला आहे.

पद्धत


जमिनीची नांगरणी ३० ते ४० सें.मी. खोलीपर्यंत करा आणि ८ ते १० मीट्रिक टन कृषि यार्ड खत घाला आणि मग त्‍यांनतर जमीन सारखी करा. बेडच्‍या दोन्‍ही बाजूंसाठी अशा प्रकारे एकच सिंचन चॅनल असलेले नर्सरी बेडस् तयार करा.
बेडवर काळ्या रंगाचे पॉलिथीन शीट ज्‍याचा आकार १५ x ५ फूट असेल ते पसरा आणि ६ ते ८ महिन्‍यांची रोगमुक्त तुतीची कलमे (३ कळ्यांसह १५ ते २० सें.मी. लांबीची) पॉलिथिनने झाकलेल्‍या नर्सरी बेड मातीत पेरा आणि रोपांतील अंतर १० सें.मी. x १० सें.मी. ठेवा. आठवड्यातून किंवा १० दिवसांतून एकदा त्‍या क्षेत्रांतील मृदेच्‍या प्रकारानुसार चॅनल सिंचन करा.

फायदे


ह्या पध्‍दतीने रानपाला पूर्णपणे नियंत्रित राहतो, कारण त्‍याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. ह्यामुळे नर्सरीच्‍या संपूर्ण काळाच्‍या दरम्‍यान (चार महिने) रानपाला खुडण्‍याची गरज नसते तसेच रानपाला खुडण्‍यासाठी मानवी प्रयासांवर होणारा खर्च ही वाचतो. वाढ होत असलेल्‍या तुतीच्‍या रोपांना रानपाल्‍याशी प्रतिस्‍पर्धा करावी लागत नसल्‍याने त्‍यांना भरपूर प्रमाणात मृदा पोषण मिळते ज्‍याचा परिणाम म्‍हणून उच्‍च गुणवत्तायुक्‍त, सशक्‍त रोपटी मिळतात. इतर पध्‍दतींपेक्षा निराळी, सिंचनाचे प्रमाण ५० टक्‍के कमी केले जाऊ शकते, कारण मातीवरील पॉलिथिनचे आवरण उल्‍लेखनीय प्रमाणात मातीचे तपमान कमी करते आणि पाण्‍याचे बाष्‍पीकरण होऊ देत नाही, ज्‍यामुळे मातीची आर्द्रता कायम राखली जाते.

मिळकत


ह्या पध्‍दतीने, चार महिन्‍यांच्‍या काळात एक एकर जमिनीत सुमारे २.३० ते २.४० लाख तुतीच्या रोपट्यांचे उत्‍पादन केले जाऊ शकते जे इतर पध्‍दतींपेक्षा रू.५०,०००/- जास्‍त मिळकत देते.

बी. मोहन, एन.शक्‍तीवेल व आर. बालकृष्‍ण
संशोधन विस्‍तार केंद्र (रीसर्च एक्‍सटेंशन सेंटर)
केंद्रीय रेशीम मंडळ (सेंट्रल सिल्‍क बोर्ड),
श्रीविलिपुत्तुर
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment