Agriculture
हवामान
महाराष्ट्र राज्याची कृषि विषयक हवामानाची परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येऊ शकते तुती लागवडीसाठी 750 मिलि. मी. ते 1000 मिलि.मी. पाऊस वर्षभर समप्रमाणात पडत असलेल्या भागात लागवड केल्यास तुतीला पोषक वातावरण मिळून पाल्याचे उत्पादन वाढते. तुती लागवडीस थंड व उष्ण दोन्हीही प्रकारचे हवामान मानवते. परंतू 250 उ ते 300 उ हे तापमान तुती झाडांच्या वाढीसाठी योग्य असून अशा हवामानास तुती पाल्याची जोमदार वाढ होते व चांगले पाल्याचे उत्पन्न घेता येते.जमीन
मध्यम, भारी, हलकी प्रकारची जमीन असली तरी तुतीची लागवड करण्यास योग्य असते. मात्र डोंगर उताराची व खारट जमीन म्हणजेच ज्या जमीनीत पानी साचून राहते किंवा पाण्याच निचरा होत नाही अशी जमीन तुती लागवडीसाठी आयोग्य असते. कारण अशा जमिनीत तुती कलमांची लागवड केली तर कलमे जास्त ओलाव्या मुळे कुजून बाद होतात. तेव्हा पाण्याचा चांगल्या प्राकरे निचरा होणाऱ्या जमीनीतच तुती लागवड करावी. तुती झाडाची मुळे खोलवर जात असल्याने ज्या जमीनीत तुती लागवड करावयाची आहे त्या जमिनीचा थर किमान 2 फुट खोल असावा. कोणत्याही प्रकारच्या जमीनीत तुती लागवड करता येत असली तरी देखील काळया कसदार मातीत तुती झाडाची वाढ अतिशय झपाटयाने होत असल्याचे आढळून आले आहे. तुती झाडाच्या वाढीसाठी जमीनीतील सामु (पी.एच.) हा 6.5 ते 7 पर्यंत असणे योग्य असतो. त्यासाठी शेतकरी बांधवांनी तुती लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीचे परिक्षण करुन घेणे महत्वाचे आहे. ज्या जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असते म्हणजेच जमीनीचा सामु 5 पेक्षा कमी असेल तर चुनखडीचा उपयोग करुन आम्लाता कमी करुन घ्यावी तसेच जमीनीचा सामू (पी.एच.) 7.5 पेक्षा जास्त असेल तर मात्र जीप्समचा वापर करुन अल्कता कमी करुन घ्यावी.
जमीन तयार करणे व शेणखताचा वापर
तुती लागवडीसाठी जमीन तयार करतांना लोखंडी नांगराने 12 '' ते 15 '' इंच (30 ते 45 सेमी.) खेल नांगरट करावी. जमीनीची नांगरट करतांना उभी व आडवी दोन्ही बाजुनी नांगरटी करावी. जेणे करुन जमीनीचा कठीणपणा जावुन ती मोकळी व भुसभुसीत होईल. एप्रिल व मे महिन्यात अशी नांगरनी केल्यास ती फायदेशीर ठरते त्यामुळे जमिनीतील किड मरते व तणाचे देखील प्रमाण कमी होते. पुन्हा 15 ते 20 दिवसानंतर लाकडी नांगराने एकादा उभी व आडवी नांगरनी करुन घ्यावी, नांगरनी झाल्यानंतर एकरी 8-10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत सर्व जमिनीत सार'या प्रमाणात पसरवावे नंतर वखरणी करुन जीमन सारखी करुन घ्यावी यासाठी मे महिण्यापुर्वीच मशागतीची तयारी केली तर जुन-जुलै महिण्यापर्यंत जमीन तयार ठेवता येते.
तुतीच्या प्रचलीत व सुधारीत जाती
तुतीची प्रचलीत जात कनव्हा-2 अथवा एम-5 ही जात निवड पध्दतीने सन 1950 मध्ये कर्नाटक राज्यातील शासकीय कनव्हा रेशीम फार्म केन्द्रामध्ये विकसित करुन लागवड करण्यासाठी शिफारस केली आहे. या जातीची निर्मिती ओपन पराग सिंचन संकर या पध्दतीने स्थानिक म्हैसूर या जातीपासून झालेली आहे. या जातीची वाढ जलद असून आंतर मशागत हवामान व जमीन या बाबींना चांगला प्रतिसाद देते. म्हैसूर लोकल या जातीपेक्षा या जातीच्या पाला रेशीम अळयांना अधिक आवडत असून तो अळयाच्या पचन शक्तीला पोषक आहे. या जातीची लागवड भारतात मोठया प्रमाणात असून हि जात श्रीलंका, बांगलादेश, पिलिपाईन्स, थॉयलँड इत्यादी देशात प्रचलित झालेली आहे. या जातीच्या फांद्या सरळ व हिरवट करडया रंगाची पाने साधी कातरलेली असून एकमेकांसमोर रचना असलेली आहे. पाने बोटीच्या आकारासारखी असून जाडसर नरम वाटतात. या जातीच्या पाल्याचे उत्पादन बागायती क्षेत्रावर 35,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्ष येत असून या झाडाना 300 कि.ग्रॅम 120 कि.ग्रॅम 120 कि. ग्रॅम नत्र, स्फुरद, पालांश खताचा मात्रा वेगवेगळया 5 हप्त्यात द्यावा लागतो. तसेच 20 टन शेणखत प्रति हेक्टर द्यावे. या जातीला 1.5 एकर इंच सिंचनासाठी पानी आवश्यक आहे. पावसावर अवलंबून लागवड असेल तर पाल्याचे उत्पादन 12,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्ष येत असून या करिता 100 कि.ग्रॅम नत्र 50 कि.ग्रॅम स्फुरद व 50 कि.ग्रॅम पालांश या खतांचा मात्रा वेगवेगळया दोन हप्त्यात द्याव्यात व 10 टन शंणखत प्रति हेक्टर प्रति हेक्टर प्रति वर्षे देणे फायद्याचे ठरते बागायती क्षेत्रासाठी तुतीचा भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती: देशातील वेगवेगळया संशोधन केंद्रावर काही ठराविक भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती विकसीत आहेत. काही जाती शेतकऱ्यांपर्यंत लागवडीकरीता गेलेल्या आहेत तर काही जात अद्यावत संस्थाच्या प्रात्यक्षिक व चाचणी केंद्रावरच आहेत. या जाती पैकी एस-30, एस-36, एस-54, एस-135, डी. डी. आणि एम.आर-2, या जाती सी एस.आर. ऍण्ड टि. आय. म्हैसूर या संस्थेने बागायती क्षेत्रासाठी विकसित केलेल्या असून त्या लागवडीखाली तसेच क्षेत्र गुणवी कार्यक'म खाली चाचण्या चालू आहेत.
1. एस- 30: या जातीचे झाड साधे वळणदार, खरवडीत, हिरवट करडया फांद्या असलेले आहे. पाने सरळ कातरलेली नाहीत. एकमेकांसमोर पानाची रचना नरम व बोटीच्या आकाराप्रमाणे वरच्या दिशेने वाकलेली पाने आहेत. पाल्याचे उत्पादन कमीत कमी बागायती क्षेत्रामध्ये योग्य ती जमीन व रासायनिक खताच्या मात्रा दिल्यानंतर 38,000 किलो प्रति हेक्टर प्रति वर्षे येते.
2. एस-36: या जातीचे झाड साधे वळणदार, हिरवट, करडया रंगाचे आहे. पाने साधी हिरवट, कातरलेली नाहीत. एकमेकासमोर पानाची रचना आहे. मोठया बोटीच्या आकारासारखी पाने दिसतात. पाल्याचे उत्पादन खात्रीशीर सिंचन व्यवस्था व खतांच्या मात्रा आवश्यकतेनुसार दिल्यानंतर 40,000 ते 42,000 किलो पाल्याचे उत्पादन प्रति हेक्टर प्रति वर्ष मिळते.
3. एस- 54: झाडाच्या फांद्या सरळ, साधारण उभ्या खरबडित हिरवट करटया रंगाच्या खालच्या फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी कोरलेली नसून, एकमेकांसमोर रचना असलेली जाडसर मोठी बोटीच्रुा आकारासारखी दिसतात. ही जात पाल्याचे उत्पादन योग्यतो खताच्या मात्राचा पूरवठा व सिंचन व्यवस्था दिली असता 46,000 किलो / हेक्टर / वर्षे उत्पादन देते. कनव्हा -2 या जाती पेक्षा 20 टक्के या याती पासून पाला उत्पादन जास्तीचे आहे. हि जात नविन संशोधन आंतर मशागत तंत्राला पोषक असून वाढीव खतांतून मात्राचा वापर केल्यास अधिक प्रतिसाद देते.
4) विरवा (डी.डी.): पूर्वी या जातीला डेहराहून या नावाने ओळखले जात असून ती वेगवेगळया नैसर्गिक जातीच्या संचातून निवड केलेली आहे व ही जात के. एस.एस. आर.डी.आय. थलगटपूरा कर्नाटक या संस्थेने विकसति केलेली आहे. या झाडाच्या फांद्या सरळ उभ्या साधारणत: पसरट आणि हिरवट - करडया रंगाच्या आहेत. पाने कातरलेली नसून समोरासमोर रचना असलेली मोठया बोटीच्या आकारासारखी गरम व लुसलुसीत आहेत. पाल्याचे उत्पादन 35,000 ते 40,000 किलो/हेक्टर/वर्षे आवश्यक ती खतांची उपलब्धता करुन दिली तर मिळते.
5) एस- 135 - (ओपीएस-135 अथवा रेनफेड सिलेक्शन 135): ही जात नैसर्गिक रित्या पराग सिंचनापासून झालेली संकरित जात आहे. या जातीची निवड कनव्हा -2 या जातीपासून सी.एस.आर. ऍन्ड टि. आय. म्हैसूर या संस्थेने विकसीत केलेली आहे. फांद्या व पानाचे गुणधर्म इतर जातीप्रमाणे आहे. पाल्याचे उत्पादन आवश्यक खताची मात्रा व पाण्याची व्यवस्था केल्यास 40,000 किलो / हेक्टर/ वर्षे आहे.
6) व्ही -1 (व्हीक्टरी -1) या जातीच्या झाडांच्या फांद्या सरळ, मोठे सरळ, जाडे व रसरशीत पाने, त्यामध्ये 75 टक्के आद्रता असते. हि जात सी.एस.आर. ऍण्ड टी.आय म्हैसूर यांना विकसीत केली असून याजातीचे पाल्याचे उत्पादन प्रति हेक्टरी 60,000 कि. ग्रॅम पर्यंत येते. बागायती क्षेत्राकरीता महाराष्ट्रात सद्या एस- 36 व व्ही-1 या जातीचे बेने उपलब्ध असुन या जाती खाली तुती लागवड क्षेत्र वाढविणे ही काळची गरज आहे. पावसाळी हंगामात / जिरायत क्षेत्रावर येणाऱ्या तुतीच्या जाती दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून पावसाचे दिवसा बाबंतही अनिश्चिता वाढत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात ज्या विभागात पावसाची अनिश्चिता आहेत. व सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही अशा विदर्भ व मराठवाडा विभागात तुतीचे जिरायत क्षेत्र वाढविण्यास पोषख वातावरण आहे. या मध्ये पुढील पैकी जातीची निवड खड्डा पध्दतीमध्ये 8 द 5 फुट अंतरावर तुतीची लागवड करावी. दोन वर्षा नंतर वाढलेल्या तुती झाडांची 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करुन त्याला आकार द्यावा. या पध्दतीमध्ये फळबाग लागवडी प्रमाणे शेतकरी पावसाळी हंगामात सोयाबीन, गहू, मुग, इत्यादी. अंतर पिके घेऊ शकतो. व येणाऱ्या तुती पाल्या पासुन रेशीम पाल्याचे उत्पादन मिळवू शकतो.
1) एस- 13 - या जातीची लागवड पावसावर अवलंबून असलेल्या भागात मोठया प्रमाणात होते व य जातीची निवड के - 2 या जातीच्या रोपापासून ओपन पराग सिंचन संकरीत निवड केलेली आहे. या झाडांच्या फांद्या वळणदार आणि हिरवट ते करडया, पाने साधी गडद हिरव्या रंगाची एकमेकांसमोर रचना असते. या जातीचे उत्पादन 15,000 कि. ग्रॅम प्रति हेक्टर प्रति वर्षे उत्पादन मिळते.
2) एस-34 - हि देखील पावसाळी हंगामात लागवड चांगली येते या जातीची निर्मिती एस- 30 आणि बेर साी - 776 या जातीचे नियंत्रित पध्दतीने परागसिंचन करु न संकर केलेले आहे. झाडाच्या फांद्या वळणदार आणि हिरवट करडया, पाने बोटीच्या आकाराची असून गडद हिरव्या रंगाची असतात.
3) विरवा (डी.डी.) : हि जात पावसाळी हंगामात के-2 जाती पेक्षा लावगवडीकरीता पोषक ठरते. या जातीचे उत्पादन 15,000 किलो प्रति हेक्टर प्रति वर्षे मिळते.
चॉकी अळयांना उपयुक्त असलेल्या तुतीच्या जाती:
चॉकी अळयांना प्रामु'याने लुसलुसीत, पाण्याचे प्रमाण 90 टक्के असलेली व प्रथिने 10 ते 20 टक्के असलेली पाने आवडतात त्यामुळे अशा प्रकारचा पाला एस-30 व एस-36 या जातीपासून उत्पादन केले जाते. रेशीम कोषाच्या उत्पादनाचे प्रमुख दोन बाबी म्हणजे पाला उत्पादन व तुती पाल्याची प्रत ह्या आहेत.
तुतीची लागवड व देखभाल
तुती बेणे तयार करणे: तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया
तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी.1) थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत.
2) बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात.
3) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.
तुतीचे लागवड अंतर
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेतकरी तुतीची लागवड करतांना 3 द 3 अंतरावर लागवड करीत होते. परंतू आता सन 98 - 99 पासून नविन सुधारीत पध्दतीनुसार फांदी पध्दत किटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पध्दतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालया मार्फत तुती लागवडीसाठी 5 द 2 द 1 फुट अंतर मध्यम जमिनीसाठी व 6 द 2 द 1 भारी जमिनीसाठी तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये तुती झाडाची सं'या एकरी 10890 इतकी बसते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात 3द3 फुट लागवड पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते.
पट्टा पध्दतीच्या तुती लागवडीपासून फायदे
1) या पध्दतीमुळे झाडाची सं'या मोठया प्रमाणात वाढते.
2) तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते.
3) आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते.
4) कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो.
5) बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो.
6) शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते.
7) मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते.
तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी
1) लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर
2) तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
3) तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये.
4) तुतीची लागवड 5 द 3 द2 किंवा 6 द 2 द 1 अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी.
5) तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये.
6) जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.
7) लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.
8) तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी.
तुती बागेची आंतर मशागत
तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होवून तुती कलमाची पाने पिवळी पडतात तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात.त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. तदनंतर प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी.
तुती झाडांची छाटणी
तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटनी करण्या फार महत्व आहे. सर्व साधारणपणे शेतकरी फांदी किटक संगोपन पध्दतीचा वापर करत असतांना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळयाने फांद्या खेचुन करतो. यामध्ये झाडांचा डींक बाहेर निघून वाया जातो. व मोठया प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळया झाड सुकून जाऊन गॅप पडतात या करिता शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमु'याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी. आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात. तदनंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व तदनंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी.
तुतीबागेस सिंचन
माहे जुलै ते नोव्हेंबर - महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने कलमें जगेपर्यंत पाणी द्यावे नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जमिनीची प्रत पाहुन साधारणत: 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात एक वेळातुती लागवडीला 1 ते 1.5 एकर इंच पाण्याची आवश्यकता असते.
तुती लागवडीसाठी गांडुळ व इतर खताचा उपयोग
तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशिर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यासाी पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतुचे कार्यप्रणाली वाढवितात त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होवून तुती पानामध्ये कार्बोहायड्ेट व प्रथीनांचे प्रमाण देखील वाढते,
गांडुळ खत वापरतांना घ्यावयाची काळजी
1. गांडूळ खत रासायनिक खतामध्ये मिश्रण करुन टाकु नये.
2. रासायनिक खत वापरण्याआधी 1 महिन्या अगोदर गांडुळ खत तुती झाडांना द्यावे.
3. गांडुळ खतामध्ये शेणखत, कम्पोस्ट खत मिसळून टाकल्यास त्यांचा चांगला फायदा होतो.
4. गांडुळखत वापरल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल.
5. पहिल्या वर्षी नविन तुती लागवडीङ्ढकरीता डिसेंबर महिण्यात गांडुळ खत वापरावे.
ऍझोटोबॅक्टर
ऍझोटोबॅक्टर या जीवाणूचा प्रती एकर प्रती वर्ष 8 किलो या प्रमाणात वापर केल्यास नत्राची मात्रा 50 टक्के ने कमी करता येते. ऍझोटोबॅक्टर, रासायनिक खताचे 10 ते 15 दिवस आधी किंवा नंतर शेणखतामध्ये मिसळून (1.6 किंलो ऍझोटोबॅक्टर + 80 किलो शेणखत या प्रमाणात) आंतरमशगतीच्या वेळेत टाकावे व तदनंतर लगेचच बागेस पाणी द्यावे.
तुतीबागेत रासायनिक खते
तुतीची वाढ योग्य होणेसाठी रासायनिक खताची मात्रा देणे महत्त्वाचे आहे. तुती लागवड केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात कलामांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी 24 किलो नत्र, स्पुरद, पालाश रिंग पध्दतीने तुती झाडांचय बाजुला गोल खड्डे करुन द्यावे व खत दिल्यानंतर त्यावर मातीचा भर द्यावा. जेणेकरुन दिलेले खत वाया जाणार नाही. दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र रिंग पध्दतीने द्यावा अशी दोन वेळा रासायनिक खताची मात्रा पहिल्या वर्षी द्यावी. तुतीच्या बागेस माती परिक्षण करुनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेणखत व रासायनिक खते जमिनीत 8 ते 10 सेमी खोलवर टाकावीत. रासायनिक खतांचा वापर कराताना एकच मुलद्रव्यांची खते जसे नत्राकरिता अमोनियन सल्फेट, स्पुरादाकरिता सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशकरिता म्युरेट ऑफ पोटॅश यांचा प्राधान्याने वापर करावा.
रासायनिक खते
नेहमीच प्रत्येक पिकाच्या छाटणीनंतर अंरमशागत झालेनंतर कोंब फुटतेवेळी 14 ते 21 व्या दिवशी देण्यात यावे.तुतीच्या झाडांवरील रोग व नियंत्रण
इतर झाडांप्रमाणेच तुतीच्या झाडांवर ही बरेच रोग आहेत. वेळेवर सर्व पाला वापरला गेल्यास मात्र या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून येत नाही. तसेच ठरावविक रोगांमुळे पुर्ण झाडाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पुर्ण पीक पाया गेले असे कधीही आढळून आलेले नाही. तरी देखील काही महत्वाच्या रोगांची व जे महाराष्ट्रात मु'यत्वे आढळून येतात अशा रोगांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
कलमावरील बुरशी
तुतीच्या लागवडीच्या वेळेस कलमास शेतकरी, बुरशीनाशक द्रावणात बुडवत नाहीत. अतिपाण्यामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे सालीच्या आतील बाजूस काळी बुरशी येते, यामुळे झाडास फुटवा येत नाही किंवा आलेला फुटवा जळून जातो.उपाय
बुरशी नाशक द्रावणात तुती कलमे लावण्यापूर्वी 5-10 मिनिटे बुडवावीत व मग लागवडीस वापरावीत. प्रादर्भाव जास्त असेल तर फुटवा झालेवर देखील झाडांवर औषधे फवारावे.वाळवी/उदई
हलक्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव निश्तिच होतो. शेतकरी भारी जमीन सहसा तुती लागवडीसाठी वापरत नाहीत. त्यामुळे हलक्या जमिनीत लागवड केली की त्या जमिनीत मोठया प्रमाणात वाळवीचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेणखतातून जमिनीत उदई अथवा उदडीचा प्रादुर्भाव होतो. उदई कोवळी कांडी कुरतडून खातात व झाडांची मर वाढते. एकरी झाडांची सं'या कमी होते.उपाय
1. लागवड करतांना क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात, कांडया (कलमे) बुडवून लावावेत.
2. फुटवा झाल्यावर फयुरॉडॉन औषध मुळांजवळ दिल्यास वाळवी अथवा उदईचा त्रास होत नाही. किंवा कुठलेही वाळवी नाशक औषध वापरावे त्याचा परिणाम संपल्यानंतरच अळयांचे किटक संगोपन घ्यावे. झाडांची मुळे खोलवर गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर हा त्रास होत नाही.
पानांवरील बुरशी
रोगाचे कारण फायलेक्टिनिया कोरिलीया, कालावधी पावसाळा व हिवाळा. तुती बागेतील पाने वेळेवर वापरली नाहीत व ज्या बागेत प्रकाश व्यवस्थित येत नाही. अशा बागेतील पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठ म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठी वेळेवर प्रमाणात अंडीपुंज घेऊन पाल्याचा वापर करावा.उपाय
वेळेत पाल्याचा वापर केल्यास रोग आढळत नाही, तथापी रोग मोठया प्रमाणात आढळयास पानांवर 0.2 टक्के बाविस्टीन अथवा 0.2 टक्के डायनोकॅप द्रावण फवारावे. फवारणीनंतर वीस दिवसांनी पाने वापरता येतात.
झाडांवर आढळून येणारी कीड
टूक्रा (बोकडया):
लक्षणे:
1. शेंडयाच्या पानाचा आकार बदलतो.
2. पाने कोमजल्यासारखी दिसतात किंवा घडया पडून आकसतात.
3. ज्या फांदीवर टूक्रा आढळतो, तो भाग जाड किंवा चपटा बनतो.
4. पाने गडद हिरव्या रंगाची बनतात.
उपाय:
1. टूक्रा रोग असलेले झाडाचे शेंडे तोडून जाळून टाकावेत.
2. 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात (10 लिअर पाण्यात 50 ग्रॅम साबण टाकवा) 0.2 टक्के डी.डी.व्ही.पी. (न्युआन 2 मि.ली. 1 लिटर पाणी) चे द्रावण तयार करुन झाडांवर फवारावे.
3. क्रिप्सोलिनस मौंटेजरीचे 100 प्रौढ किटक 10 ते 12 हजार तुतीच्या झाडामध्ये सोडावेत.
लष्कर अळी:
लक्षणे : बऱ्याच ठिकाणी पानांवर लष्कर अळी आढळते. लष्कर अळीचे पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळया एकाच पानांच्या खालच्या भागावर असतात. अळया पानाचा हिरवा भाग खाऊन पान जाळीदार बनवतात. अळया मोठया झाल्या की समुहात राहत नाहीत. त्या स्वतंत्र्यपणे संचार करतात. अळयांच्या अंगावर मोठे लांब केस असतात. प्रथम तांबूस दिसणाऱ्या अळया नंतर काळया रंगाच्या होतात. ह्या अळया मोठया प्रमाणावर पाला खातात यामुळे पानांचे एकरी उत्पन्न कमी होते.
उपाय:
अळया लहान असतांना जाळीदार दिसणारे पाने अळया सहित तोडून नष्ट करावेत. अळयांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर रोगार, 0.2 टक्के फवारावे. पानांवर फावारणी केल्यानंतर 20-25 दिवसानंतरच पाला अळयांना घालण्यात यावा.
0 comments:
Post a Comment