कैरीपासून पन्हे आणि लोणचे

पन्हे


कच्च्या आंब्याचा गर - १ किलो
मीठ - १२० ग्रॅम
काळे मीठ - ८० ग्रॅम
जिरे पावडर - ४० ग्रॅम
पुदिना पाने - २०० ग्रॅम
सायट्रिक ॲसिड - २० ग्रॅम
साखर - ४५० ग्रॅम
सोडियम बेन्झोएट - १ ग्रॅम
पाणी - गरजेनुसार
कृती - आंबे स्वच्छ धुऊन घ्यावेत. समप्रमाणात आंबे व पाणी (१ः१) घेऊन आंबे नरम होईपर्यंत शिजवावेत. गर काढून घ्यावा. सोडियम बेन्झोएटव्यतिरिक्त सर्व घटक पदार्थ एकत्र बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण स्टील किंवा नायलॉनच्या चाळणीमधून गाळून घ्यावे. मिश्रण मोजावे. चार किलो वजन होण्यासाठी उर्वरित पाणी मिक्स करावे. सोडियम बेन्झोएट थोड्या पदार्थामध्ये मिसळून नंतर संपूर्ण पन्ह्यामध्ये मिसळावे. तयार पन्हे काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पॅक करावे. पिण्यासाठी पन्हे तयार करताना एक भाग पन्हे व तीन भाग थंड पाण्यात मिसळून आस्वाद घ्यावा. सदर पन्हे साखर वगळून इतर घटक पदार्थ वापरून साखरविरहितसुद्धा करता येते.

बिनतेलाचे लोणचे


आंबा फोडी - १ किलो
मीठ - ११० ग्रॅम
मिरची पावडर - ३० ग्रॅम
हिंग - १० ग्रॅम
सोडियम बेन्झोएट - ०.२५ ग्रॅम
कैरीचे साल काढावे. छोटे चौकोनी तुकडे करावेत. मीठ सोडियम बेन्झोएट मिसळावे. फोडी उन्हामध्ये दोन दिवस वाळवाव्यात. नंतर मिरची पावडर व हिंग पावडर मिसळावी. तयार लोणचे स्वच्छ काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरावे.

लेखक -डॉ. गीता रावराणे- मोडक
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment