गोटा खोबरे -
गोटा खोबरे 12
महिने पक्वतेच्या नारळापासून तयार केले जाते. छपराखाली बांबूचे मचाण करून
त्यावर 8 ते 12 महिने नारळ साठविले जातात. या कालावधीत सर्व पाणी आटून
जाते. नारळ फोडून करवंटीपासून अखंड खोबरे वेगळे केले जाते.
डेसिकेटेड खोबरे -
यामध्ये
खोबऱ्यावरील काळा भाग काढला जातो. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे
छोटे तुकडे केले जातात. यामध्ये दोन ते तीन टक्के पाणी असते, तर तेलाचे
प्रमाण 68 ते 70 टक्के असते. मिठाई, इतर खाद्य कारखाने विशेषतः चॉकलेट आणि
कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो. डेसिकेटेड कोकोनट बनविण्यासाठी पूर्ण
परिपक्व नारळाची निवड केली जाते. नारळ प्रथम सोलून, त्याचे दोन तुकडे करून,
खोबरे करवंटीपासून वेगळे करून, खोबऱ्यावर असलेली तपकिरी रंगाची साल वेगळी
केली जाते. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने ते धुतले जातात.
यामुळे खोबऱ्याला चिकटलेला नको असलेला भाग काढला जातो. हे तुकडे ठराविक
तापमानाला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात. नंतर या तुकड्यांचा किस करून वाळवणी
यंत्रामध्ये वाळविले जातात. वाळविलेला किस जसाच्या तसा प्लॅस्टिकच्या
थैलीमध्ये हवाबंद केला जातो किंवा त्याची भुकटी करून हवाबंद केली जाते.
नारळ मलई -
नारळाच्या
दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग
करण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठीही
याचा वापर केला जातो.
शहाळ्याचे पाणी -
शहाळ्याच्या
पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या
शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. "चौघाट ऑरेंज ड्वार्फ'
ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत
शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते.
स्नोबॉल टेंडर नट -
यामध्ये शहाळे
नारळाचे सोडण, करवंटी आणि खोबऱ्यावरील लाल साल काढून टाकली जाते. आठ महिने
वयाच्या नारळापासून स्नोबॉल टेंडर नट तयार केले जातात. यामध्ये पूर्ण पाणी
असते. तसेच खोबरे मऊ असते.
खोबऱ्याची पेंड -
सुक्या
खोबऱ्यापासून तेल काढल्यानंतर सुमारे 35 ते 36 टक्के चोथा शिल्लक राहतो.
त्याचा जनावरांचे खाद्य म्हणून वापर करता येतो, तसेच कोंबडी खाद्यासाठीही
याचा उपयोग होतो.
करवंटीची भुकटी -
स्वच्छ करवंटी
दळून त्याची भुकटी तयार केली जाते. तिचा उपयोग लाकडाच्या भुश्शाऐवजी
मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, बकेलाइट कारखान्यात, फिलर म्हणून मच्छर
अगरबत्ती आणि इतर अगरबत्ती, फिनॉलीन पावडरमध्ये आणि प्लायवूड लॅमिनेटेड
बोर्डात वापरली जाते.
सोडण -
नारळ फळात 35 टक्के सोडण असते. नारळ फळाच्या सोडणापासून 90 ग्रॅम काथ्या, तर 180 ग्रॅम काथ्याचा भुस्सा मिळतो.
सोडण भुस्सा (क्वायर पीथ) -
सोडणापासून काथ्या
अलग केल्यानंतर 70 टक्के सोडण भुस्सा मिळतो. यालाच "क्वायर पीथ' असे
म्हणतात. याचा उपयोग मातीची प्रत सुधारणे, मुळे फुटण्यासाठी माध्यम आणि
आच्छादन म्हणून वापरतात.
संपर्क - 02352-235077.
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी.
संपर्क - 02352-235077.
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी.
वैभव रांजणे, लांजा, जि. रत्नागिरी.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
0 comments:
Post a Comment