सोयाबीनचा औद्योगिक वापर

सोयाबीनमध्ये पोषक अन्नघटक, आरोग्यदायी व औषधी गुणधर्म असल्याने त्याचा औद्योगिक वापर वाढतो आहे. चांगल्या गुणवत्तेच्या प्रथिनांशिवाय सोयाबीन हा ग्लायसिन, ट्रि प्टोफॅन व लायसीन या अत्यावश्‍यक असलेल्या अमिनो ऍसिडसचा महत्त्वाचा स्रोत आहे. तसेच आवश्‍यक फॅटी ऍसिडचे प्रमाण भरपूर आहे. सोयाबीन तेल कोलेस्टेरॉल मुक्त असून त्यात ओमेगा तीन व सहा फॅटी ऍसिडचा अंतर्भाव आहे.
सन 2007-08 मध्ये सोयाबीनचे जागतिक उत्पादन 223 दशलक्ष मे.टन इतके होते. सोयाबीनचे उत्पादन करणारे देश प्रामुख्याने यूएसए, ब्राझील, अर्जेंटिना, चीन, भारत, पॅरा ग्वे, इ. असून त्यांचे उत्पादन व टक्केवारी तक्ता क्र.1 मध्ये दर्शविलेली आहे. जागतिक तेलबियांचे उत्पादनाचा आढावा घेता सन 2007-08 मध्ये जागतिक उत्पादन 339 दशलक्ष मे.टन इतके होते. त्यात सोयाबीनचा वाटा 57 टक्के होता. विविध तेलबियांचे जागतिक उत्पादन व टक्केवारी तक्ता क्र.2 मध्ये नमूद केलेली आहे.
खाद्यतेलासाठी सोयाबीन एक महत्त्वाचा स्रोत आहे. हे चौकटीतील आकडेवारीवरून लक्षात येते.आपल्या देशाचे सन 2007-08 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 9.5 दशलक्ष मे.टन इतके होते. देशातील सोयाबीन उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यात मध्य प्रदेश व महाराष्ट्र ही राज्य आघाडीवर आहेत. जागतिक स्तरावर सोयाबीनची उत्पादकता प्रति हेक्‍टर सरासरी 20 क्विंटल असून, आपल्या देशात मात्र ती फक्त 11 क्विंटल इतकीच आहे. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यास आपल्या देशात प्रचंड वाव आहे.
अन्न आणि कृषी या जागतिक संस्थेच्या (एफएओ) अहवालानुसार उत्पादित सोयाबीनपासून प्रथिनांची उपलब्धता सर्वसाधारण 161.8 किलोग्रॅम इतकी असून तृणधान्य व कडधान्यांशी तुलना करता हे प्रमाण दुप्पट आहे. (तक्ता क्र.3) दूध देणाऱ्या परंतु शेतात चरणाऱ्या जनावरांशी तुलना करता हे प्रमाण चार ते पाच पट जास्त आहे. तर मांस देणाऱ्या जनावरांशीतुलना करता हे प्रमाण 8 ते 15 पटीहून जास्त आहे.
सोयाबीनमधील विविध घटकांचे सर्वसाधारण प्रमाण तक्ता क्र.4 मध्ये नमूद केले आहे. सोयाबीनमधील प्रथिनांचे प्रमाण इतर कडधान्ये तसेच तेलबिया विशेषतः शेंगदाणे यां च्यापेक्षा दुपटीने तर अंड्यापेक्षा तीन पटीने जास्त आहे.
सोयाबीनमध्ये सर्वांत जास्त प्रथिनांचे प्रमाण असल्याने प्रतिकिलो प्रथिनांची किंमत अत्यंत वाजवी व गरिबास परवडणारी अशी आहे. सोयाबीनमधील प्रथिनांची गुणवत्ता उच्च प्रतीची असून त्यांची तुलना अंडी, दूध अथवा मांस याबरोबरच होऊ शकते. (तक्ता क्र.5) चांगल्या गुणवत्तेच्या प्रथिनांशिवाय सोयाबीन हा ग्लायसिन, ट्रिप्टोफॅन व लायसीन या अत्यावश्‍यक असलेल्या अमिनो ऍसिडसचा महत्त्वाचा स्रोत आहे.
सोयाबीनमध्ये वनस्पती तेलाचे प्रमाण 20 टक्के आहे. सोया तेलाची प्रत अत्युत्तम असून त्यात सॅ च्युरेटेड स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अत्यल्प तर आवश्‍यक फॅटी ऍसिडचे प्रमाण भरपूर आहे. सोयाबीन तेल कोलेस्ट्रॉलमुक्त असून त्यात ओमेगा तीन व सहा फॅटी ऍसिडचा अंतर्भाव आहे. त्यामुळे माशाच्या तेलाप्रमाणेच ते शरीरास पोषक आहे.

सोयाबीनमध्ये द्राव्य तसेच विद्राव्य तंतुमय पदार्थांचे प्रमाण चांगले आहे. द्राव्य तंतुमय पदार्थांचा वापर आहारात झाल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. पर्यायाने रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते. विद्राव्य तंतुमय पदार्थांमुळे अन्नपचन सुलभ होऊन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. सोयाबीनमध्ये कॅल्शिअम, लोह, स्फुरद व जस्त इ. शरीरास आवश्‍यक असणाऱ्या सूक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण इतर कडधान्याशी तुलना करता दुप्पट असून सोडिअमचे प्रमाण अत्यल्प आहे. सोयाबीनमध्ये सर्व महत्त्वाची जीवनसत्त्वे असून बी कॉम्प्लेक्‍स व ई-जीवनसत्त्वाचा तो महत्त्वाचा स्रोत आहे. सोयाबीनमध्ये विविध पोषक अन्नघटकांबरोबरच त्यात फायटोस्टेरॉल (आयसोक्‍लेव्हान व सॅपोनीन) व लेसिथीन, इ. औषधी घटकसुद्धा आहेत.

सोय आयसोफ्लेव्हान्स


सोय आयसोफ्लेव्हान्स हे औषधी गुणधर्म असलेले पॉलीफेनॉलयुक्त रासायनिक संयुग असून वनस्पतिजन्य प्लेव्होनाइडस या वर्गात ते मोडते. त्याचा प्रभावी वापर कर्करोग,छाती व फुफ्फुस रोगोपचार, तसेच डोकेदुखी, अंगाचा दाह, रोगांच्या उपचारासाठी होतो.
आयसोफ्लेहान्सचा विपुल प्रमाण असलेला स्रोत म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. सोयाबीनपासून केलेल्या विविध पदार्थांत म्हणजे सोया दूध, सोय टोफू, सोय पीठ, भाजके सोयनट्‌स, सोय जर्म, सोय प्रोटिन व आयसोलेट्‌स, इ.च्या माध्यमातून आयसोफ्लेव्हान्स उपलब्ध होऊ शकतात.
पाव लिटर सोया दूध अथवा योगर्ट/ 50 ग्रॅम सोयपीठ/ 50 ग्रॅम शिजविलेले सोयाबीन, इ. पासून 50 मिलिग्रॅम आयसोफ्लेव्हान्स उपलब्ध होऊ शकतात. उत्तर अमेरिकन मेनोपॉज संस्थेने एक शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध केला आहे.या अहवालात 50 मिलिग्रॅम प्र तिदिन आयसोफ्लेव्हान्स सेवन केल्यास कोलेस्टेरॉल कमी होणे व हाडास बळकटी येणे, 40 ते 80 मिलिग्रॅम प्रति दिन आयसोफ्लेव्हान्स सेवनाने रक्त वाहिन्यास बळकटी येणे व रक्तदाब उत्तम राहणे हे निष्कर्ष नमूद केलेले आहेत.

सोय लेसिथीन

सोया तेलाच्या प्रक्रियेधून फास्फोलिपिड म्हणून सोया लेसिथीन सोयातेलाच्या 1.8 टक्के (शुद्ध स्वरूपात) इतके प्राप्त होते. सोय लेसिथीनचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
अन्नप्रक्रिया उद्योग : इमल्सीफाय म्हणून मार्गारिन, चॉकलेट, कॅरामल, कोटिंग्ज, च्युइं गम्स, इन्स्टंट फूड्‌स, बेकरी पदार्थ, दुग्धोद्योगाशी संबंधित पदार्थ, मांस व पोल्ट्रीयुक्त पदार्थ, इ. मध्ये लेसिथीनचा वापर केला जातो.
अन्नप्रक्रिया उद्योग : इमल्सीफाय म्हणून मार्गारिन, चॉकलेट, कॅरामल, कोटिंग्ज, च्युइं गम्स, इन्स्टंट फूड्‌स, बेकरी पदार्थ, दुग्धोद्योगाशी संबंधित पदार्थ, मांस व पोल्ट्रीयुक्त पदार्थ, इ. मध्ये लेसिथीनचा वापर करतात.
रोगोपचारासाठी उपयोग : मज्जासंस्था व हृदयसंस्था यांच्याशी संबंधित रोगांसाठी व रोगप्र तिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो.
औद्योगिक : सौंदर्यप्रसाधने, औषधे, कोटिंग्ज, प्लॅस्टिक व रबर, ग्लास व सिरॅमिक, चिकट पदार्थ निर्मिती, वस्त्रोद्योग व कातडी कमावणेसाठी वापरले जाते.

सोय सॅपोनिन्स

सोय सॅपोनिन्स हे स्टेरॉइडयुक्त ग्लायकोसाईड्‌स असून त्यांचे सोयाबीनमध्ये प्रमाण दोन ते पाच ग्रॅम/ 100 ग्रॅम इतके आहे. पाण्यास विरघळविल्यास सॅपोनिन्सचा साबणासारखा फेस होतो. त्यामुळे त्याचा उपयोग फेस निर्माण करणारा पदार्थ व इमल्सियर म्हणून अन्नपदार्थामध्ये केला जातो. त्याशिवाय सॅपोनिन्स फायटोस्टेरॉल संयुग असल्याने रोगप्र तिकार गुणधर्मामुळे त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) हेल्थक्‍लेम

मागील 30 वर्षांत सोयाबीनवर झालेल्या संशोधनावर आधारित सोया प्रथिनांबाबत अमे रिकेच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने ऑक्‍टोबर 1999 मध्ये हेल्थेक्‍ले मविषयक माहिती प्रसिद्ध केली. त्यानुसार आपण दैनंदिन आहारात सोयप्रथिनांचा 25 ग्रॅम इतका वापर केल्यास हृदयरोग होण्याचे टाळू शकतो.

सोयाबीनवर आधारित विविध अन्नपदार्थ

आपल्या देशात सोयाबीनचा वापर मुख्यत्वेकरून खाद्यतेल निर्मितीसाठी केला जातो. यातून उत्पादित होणाऱ्या सोयामील पैकी 65-70 टक्के सोयामील निर्यात केले जाते. अ मेरिकन कंपन्यांनी दुग्धजन्य व मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून सोय आधारित 130 पदार्थ जगाच्या बाजारपेठेत आणले आहेत. सोयामुक्त व सोयाधारित पदार्थांच्या माध्य मातून हजारो कोटींची बाजारपेठ वरील कंपन्यांनी काबीज केलेली आहे. सोय आधारित पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड वाव आहे. प्रथिनमुक्त सोयाप्रोटिन्स सोया मीलच्या दहा पट जास्त किंमत देऊन आपण आयात करतो किंबहुना सोयामीलपासून सोयाप्रोटिन्स करण्यास भरपूर वाव आहे.
(लेखक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,
पुणे येथे प्रकल्प सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment