शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व कडब्याची
साठवणूक करून बाजारभावाप्रमाणे त्याची विक्री करावी. इतर तृणधान्याच्या
बरोबरीने ज्वारीमध्ये चांगली पोषणमूल्ये आहेत, त्यामुळे महिला बचत गटांनी
ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले, तर त्याला बाजारपेठेतदेखील
चांगली मागणी राहील.
रब्बी ज्वारीचा खाण्यासाठी आणि दूध धंद्यात जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये रब्बी ज्वारीच्या कडब्यास सुका चारा म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या शेतकरी रब्बी ज्वारी तयार झाल्यानंतर जवळच्या स्थानिक बाजारपेठेत किंवा संबंधित जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारी व कडबा विकतात, त्या वेळी बाजारभाव खाली आलेले असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व कडब्याची साठवणूक करून बाजारभावाप्रमाणे त्याची विक्री करावी. इतर तृणधान्यांच्या बरोबरीने ज्वारीमध्ये चांगली पोषणमूल्ये आहेत, त्यामुळे महिला बचत गटांनी ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले, तर त्यालादेखील चांगली मागणी राहील

1) रब्बी ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ
पीठ, भाकर (मऊ व कडक), लाह्या, ज्वारीचा
हुरडा, पापड, पोहे, ज्वारीच्या कण्या/ रवा, गूळ/खांडसरी/ काकवी (सिरप),
अल्कोहोल, भातवड्या, वडे, थालीपीठ, बिस्कीट, पाव, कुरड्या, इडली, धिरडे.
2) रब्बी ज्वारी कडब्यापासून मूल्यवर्धित प्रक्रिया पदार्थ
ओल्या चाऱ्यापासून मूरघास (सायलेज), कडबाकुट्टी, कडबा बारीक करून त्याचे चौकोनी ठोकळे तयार करणे, ज्वारी कडब्याबरोबर हरभरा, भुईमूग, तूर, मूग, उडीद इ. भुसकटांचा वापर करून योग्य मिश्रण तयार करता येते.
अशी आहे बाजारपेठ
रब्बी ज्वारीवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांपैकी पीठ, भाकरी, हुरडा या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरी भागामध्ये हॉटेल्समध्ये ज्वारीची भाकरी ग्राहकांकडून मोठ्या चवीने खाल्ली जाते. म्हणून या हॉटेलला भाकरी पुरवण्याचे कंत्राट महिला बचत गटांना मिळविता येणे शक्य आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये काही महिला बचत गट शहरातील जवळच्या हॉटेल्समध्ये दररोज भाकरी पुरवीत आहेत, त्याचप्रमाणे शहरामध्ये असलेल्या मॉल्समध्ये ज्वारीचे पीठही विक्रीस ठेवता येईल. ज्वारीचा हुरडा रस्त्याच्या कडेला स्टॉल मांडून त्याची चांगल्या प्रकारे विक्री करता येईल. ज्वारीचे इतर पदार्थ- उदा. ः कुरड्या, पापड, लाह्या यांची मागणीप्रमाणे शहरी दुकानात विक्री करता येईल.
रब्बी ज्वारीचा कडबा हा जनावरांना अतिशय पाचक असून, त्याला राज्य तसेच परराज्यांतील पशुपालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु ज्वारी कडबा नगावर न विकता त्याची कुट्टी करून शहराजवळील तबेल्यांमध्ये याची विक्री करता येईल. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:चा संघ तयार करून, ग्राहकास रब्बी ज्वारी, कडबा व मूल्यवर्धित पदार्थ यांची विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
- 02426-243757
- 988138598
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत.)
0 comments:
Post a Comment