दर कोसळतात त्या वेळी करा मूल्यवर्धन
टोमॅटोचे दर जेव्हा कोसळतात, त्या वेळी निराश होण्याची गरज नाही. त्यावर साधीसोपी प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करून त्याची पावडर तयार करा. बाजारपेठेत अशा तयार पदार्थांना मार्केट तयार करणे शक्य आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
अलीकडील काळात विविध शेतमालांच्या प्रक्रियेला महत्त्व आले आहे. उदाहरण घ्यायचे तर आल्याची वा लसणाची पेस्ट बाजारात तयार मिळू लागली आहे. सध्याच्या काळात शहरांमधील रहिवाशांना धकाधकीच्या जीवनातून वेळेची कमतरता जाणवते. साहजिकच ते अशा तयार पदार्थांना पसंती देतात. त्यामुळे काळाची व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून तसा व्यवसाय करण्याची संधी आहे.
टोमॅटोचे उदाहरण घेऊया. टोमॅटोची पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे.
टोमॅटोचे आहारात विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, शिवाय अँटिऑक्सिडंट या महत्त्वाच्या आरोग्यदायी घटकाबरोबर तंतुमय पदार्थ (फायबर्स), खनिजे व जीवनसत्त्वे यांचा त्यात चांगला समावेश असतो. लायकोपीन या घटकाचे प्रमाणही त्यात भरपूर म्हणजे प्रति किलोमागे 60 ते 90 मिलिग्रॅमपर्यंत असते. ताज्या टोमॅटोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले म्हणजे शंभर ग्रॅममागे 237 मिलिग्रॅमपर्यंत असते. लोह, कॅल्शिअम, मॅंगनीज आदींनीही टोमॅटो समृद्ध असतो.
टोमॅटोबाबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे त्याच्या किमती कधीही स्थिर नसतात. अनेकवेळा तर शेतकऱ्यांना माल बाजार समितीतच सोडून जावा इतकी वाईट वेळ येते. अशा वेळी टोमॅटो साठवणूकगृहांचा पर्याय काही जण मांडतात. मात्र, टोमॅटो सौरऊर्जेच्या साह्याने वाळवून त्याची पावडर तयार करण्याचाही एक पर्याय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. त्याचे साधे सोपे तंत्रज्ञानही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत आंध्र प्रदेशातील रेडीपल्ली, अनंतपुरम येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञांनी उपलब्ध केले आहे. ते थोडक्यात असे.

सुरवातीला पूर्ण पिकलेले टोमॅटो घ्यावेत. मुलायम वस्त्राने ते स्वच्छ कोरडे करावेत, जेणेकरून पृष्ठभागावर पाण्याचा अंश राहणार नाही. टोमॅटोचे उभे सहा ते आठ काप करावेत व ते लाकडी ट्रेमध्ये कोरडे करावेत.
पावडर स्वरूपात त्यांची साठवणूक करता येते, अथवा त्याचे सुकलेले काप पॉलिथिन पेपरवरती ठेवता येतात.
टोमॅटोच्या वाणानुसार एक किलो टोमॅटोपासून 50 ते 55 ग्रॅम पावडर मिळते.
जर ग्राहकाला शंभर ग्रॅम टोमॅटो एवढा वापर करायचा असेल, तर त्याला केवळ पाच ग्रॅम पावडरीचा वापर केला तरी ते पुरेसे होते. विशेष म्हणजे टोमॅटोमधील पोषक द्रव्यांचा फारसा काही ऱ्हास होत नाही.

सूर्यप्रकाशात टोमॅटो काप सुकवणीचा कालावधी
तापमान (अंश सेल्सिअस) सुकण्याचा कालावधी (दिवसांमध्ये)
34 5- 6
38 3- 4
40 व त्याहून अधिक 2- 3
34 5- 6
38 3- 4
40 व त्याहून अधिक 2- 3
टोमॅटोतील पोषणमूल्ये
पोषणद्रव्ये ताजे टोमॅटो सुकवलेले टोमॅटो
(मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम)
जीवनसत्त्व क 27 26.7
लायकोपीन 50-70 63.04
(मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम)
जीवनसत्त्व क 27 26.7
लायकोपीन 50-70 63.04
स्त्रोत: अग्रोवन
0 comments:
Post a Comment