काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते.
बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो.
काजू प्रक्रियेविषयी माहितीसाठी आपण कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (02358-280558) या ठिकाणी संपर्क साधावा.
0 comments:
Post a Comment