हळदपूड
हळकुंडे तयार झाल्यानंतर त्यापासून हळदपूड तयार करताना पॉलिश केलेली हळकुंडे यंत्रामध्ये दळली जातात. त्यातून निघालेली पूड 300 मायक्रॉन चाळणीतून चाळली जाते. दुहेरी पिशवीत भरलेली हळदीची भुकटी (ओलावा नऊ टक्के) चांगल्या स्थितीत राहू शकते.
तेलनिर्मिती
हळद ही औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून निघणाऱ्या तेलालाही चांगली मागणी आहे. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून पाच ते सहा टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे असते.
ओलीओरिझिन निर्मिती
हळदीच्या भुकटीपासून ओलीओरिझिन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात.
याला चांगली मागणी आहे.
याला चांगली मागणी आहे.
औषधेनिर्मिती
औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक शक्तिवर्धक व रक्त शुद्ध करणारी आहे, त्यामुळे हळदीला औषधनिर्मितीमध्ये चांगली मागणी आहे.
संपर्क - 0233- 2437288
हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली
संपर्क - 0233- 2437288
हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली
0 comments:
Post a Comment