यांत्रिक पद्धतीने दुधाचे कॅन, बाटल्या, दूधप्रक्रिया यंत्रांची व उपकरणांची एकसारखी स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळी स्वच्छता यंत्रे वापरली जातात. यामुळे मनुष्यबळ कमी लागून स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या खर्चात 25 टक्क्यांपेक्षा जास्त बचत होते.
दुधाचे कॅन व बाटल्या स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी यांत्रिक पद्धत वापरली जाते. कॅन व त्याची झाकणे पुढीलप्रकारे स्वच्छ व निर्जंतुक केली जातात.
दुधाचे कॅन व बाटल्या स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी यांत्रिक पद्धत वापरली जाते. कॅन व त्याची झाकणे पुढीलप्रकारे स्वच्छ व निर्जंतुक केली जातात.
- द्रव दुधाचे अवशेष निघून जाण्यासाठी कॅन नितळावेत.
- थंड किंवा कोमट पाण्याच्या फवाऱ्याने विसळून त्यानंतर नितळावेत.
- कॅनमध्ये डिटर्जंटच्या 70 अंश सेल्सिअस (0.5 टक्क्यापेक्षा कमी अल्कधर्मीय) पाण्याच्या द्रावणाची फवारणी करून सोडून कॅन स्वच्छ करावा.
- 88 ते 93 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याची फवारणी करावी.
- पाण्याची वाफ कॅनमध्ये फवारावी.
- 95-115 अंश सेल्सिअसची गरम हवा वापरून कॅन कोरडे करावेत.
यांत्रिक पद्धतीने बाटल्यांची स्वच्छता
- नितळल्यानंतर 32 ते 38 अंश सेल्सिअसच्या पाण्याने विसळाव्यात.
- डिटर्जंटच्या (1 ते 3 टक्के धुण्याचा सोडा) द्रावणाने 60 ते 75 अंश सेल्सिअस दरम्यानच्या दोन टप्प्यांत बाटल्या स्वच्छ कराव्यात.
- डिटर्जंटचे शिल्लक अवशेष काढून टाकण्यासाठी 25 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याने विसळाव्यात.
- 35 ते 50 पीपीएम उपलब्ध क्लोरिनच्या थंड द्रावणाने विसळाव्यात.
- बाटल्या यंत्रातून बाहेर आल्यानंतर नितळण्यासाठी ठेवल्या जातात.
यांत्रिक पद्धतीचे फायदे
- जागा कमी लागते.
- मनुष्यबळ कमी लागते.
- वेळेची बचत होते.
सीआयपी पद्धत
यंत्रांचे व उपकरणांचे भाग सुटे न करता त्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आहे त्या जागीच केली जाते.
फायदे
- मानवी हस्तक्षेप होत नसल्यामुळे यंत्राच्या संपूर्ण भागाची एकसारखी स्वच्छता व निर्जंतुकीकरण दिवसेंदिवस होत राहते.
- दररोज करावी लागणारी यंत्राचे भाग सुटे करून परत जोडण्याची प्रक्रिया टाळल्यामुळे यंत्राची हानी कमी होते.
- स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या खर्चात 25 टक्क्यांपेक्षा जास्त बचत होते, मनुष्यबळ कमी लागते.
- मानवी चुकांमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गाची शक्यता कमी होते.
- दुग्धप्रक्रिया प्रकल्पाच्या उपयोगीतेत वाढ होते.
सीआयपी पद्धतीची यशस्विता
- पाइप व संबंधित भागांची योग्य निवड, उपकरणांची योग्य स्थापना व पाइपच्या मार्गाची योग्य निर्मिती.
- स्वच्छतेच्या द्रावणांचे योग्य तापमान.
- स्वच्छतेच्या द्रावणाचा योग्य वेग.
- खास निर्माण केलेल्या डिटर्जंटचा वापर.
- डिटर्जंट द्रावणाची योग्य तीव्रता.
- स्वच्छतेसाठीचा पुरेसा वेळ.
सीआयपी पद्धतीने एचटीएसटी पाश्चरीकरण संयंत्राची स्वच्छता
- संयंत्रातील शिल्लक दुधाचे अवशेष संपून स्वच्छ पाणी बाहेर येईपर्यंत थंड किंवा कोमट पाणी प्रवाहित करावे.
- 0.15 ते 0.60 टक्के आम्लतेचे फॉस्फोरिक/ नायट्रिक आम्लाचे द्रावण प्रवाहित करून 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानास 20 ते 30 मिनिटे पुनर्प्रवाहित करावे.
- आम्लाचे द्रावण नितळणे यासाठी स्वच्छ पाणी प्रवाहित करावे.
- 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानाचे स्वच्छ पाणी 5 ते 7 मिनिटे प्रवाहित करून नितळावे.
- 0.15 ते 0.60 टक्के तीव्रतेचे अल्कधर्मीय डिटर्जंट द्रावण प्रवाहित करून 65 ते 71 अंश सेल्सिअस तापमानास 20 ते 30 मिनिटे पुनर्प्रवाहित करावे.
- अल्कली द्रावण नितळणे यासाठी स्वच्छ पाणी प्रवाहित करावे.
- संपूर्ण यंत्रणा गरम होईपर्यंत 71 ते 82 अंश सेल्सिअस तापमानाचे स्वच्छ पाणी प्रवाहित करून नितळणी करावी.
- नितळण्यासाठी व कोरडे होण्यासाठी पाश्चरीकरण संयंत्राच्या पट्ट्या काहीशा सैल कराव्यात.
- नियमित कालावधीच्या अंतराने उपकरणाचे भाग सुटे करून काळजीपूर्वक स्वच्छता तसेच दुधाच्या संपर्कात येणाऱ्या संपूर्ण पृष्ठभागाचे निरीक्षण करावे.
दुधाची साठवण टाकी, टॅंकरची सीआयपी पद्धतीने स्वच्छता
दुधाची साठवण टाकी व टॅंकरची सीआयपी पद्धतीने स्वच्छता करताना संपूर्ण पृष्ठभागावर डिटर्जंटच्या द्रावणाची एकसारखी फवारणी होण्यासाठी खास प्रकारची फवारणी उपकरणे वापरली जातात. स्वच्छता करण्यासाठी पुढील प्रक्रिया केली जाते.- थंड पाण्याने धुऊन व 3 ते 5 मिनिटे निथळावीत.
- 0.35 ते 0.50 टक्के तीव्रतेच्या 70 अंश सेल्सिअस तापमानाच्या सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाने 15 ते 20 मिनिटे धुवावे. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा आम्ल व अल्कली वापरावी.
- 3 ते 5 मिनिटे नितळणी करावी.
- 65-70 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याने धुवावे. त्यानंतर 3 ते 5 मिनिटे नितळावे.
- 90 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी 2 ते 3 मिनिटे किंवा 150 ते 200 पीपीएम उपलब्ध क्लोरिनचे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाचे द्रावण 1 ते 2 मिनिटे वापरून निर्जंतुकीकरण करावे.
- 3 ते 5 मिनिटे नितळणी करावी.
- 1 ते 2 मिनिटे गरम हवा दाबाखाली प्रवाहित करावी.
संपर्क - डॉ. बी. आर. कदम, 9762505866
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
0 comments:
Post a Comment